...वस्तूबाजारातून हीरा खरेदी ...
हीरा हा एक मौल्यवान आणि सामन्यांच्या आवाक्यात न येणारा धातु /रत्न आहे असे अनेकांना वाटते . त्यांच्या संकल्पना बदलून टाकणाऱ्या काही कल्पक योजना घेवून येण्यास ,इंडियन कमोडिटी एक्चेंज (ICEX) तयार आहे . सेबी या भांडवलबाजार नियामकाकडून (Securities &Exchange Board of India ) नुकतीच त्यांच्या हीरा खरेदी एस ई पी ला मंजूरी मिळाली आहे .त्यामुळे आता हीरा खरेदी /विक्री करणे सोपे झाले आहे. किमान 1 सेंट हीऱ्याच्या किंमती एवढी रक्कम (अंदाजे ₹900/-)आपण दरमहा गुंतवून (एस आई पी)30 सेंट 50सेंट आणि 100 सेंट या तीन प्रकारात आपण हीरा खरेदी करू शकणार आहोत . lCEX चा सदस्य असलेल्या दलालाकडे आपल्या ग्राहक ओळखी KYC ची पूर्तता करून एक खाते काढावे लागेल .जर आपल्या दलालांनी ही सेवा आपणास देवू केली असेल तर त्याच्यामार्फत हे व्यवहार आपण करू शकतो .काही तांत्रिक कारणाने आपले समभाग , रोखे , यूनिट असलेले निक्षेपीकेकडील सध्याचे खाते ( D -mat account) आपणास या व्यवहारात वापरता येत नसल्याने जास्तीचे एक डी मॅट खाते काढावे लागेल .हे व्यवहार पुढील महिन्यात नियमित सुरू होतील ,यासंबंधी प्रयोग तत्वावर काही चाचणी व्यवहार (MockTrading) ICEX वर होत आहेत .या बाजारात घेतलेला हीरा हा अमूर्त (Electronic) पद्धतीने खरेदी करता येत असल्याने 1 सेंटहून कमी /अधिक खरेदी करता येवू शकेल .मांत्र जर तो वस्तूरूपात (Physical Form) हवा असेल तर किमान 30 सेंट आपण खरेदी केलेले असले पाहिजेत . दरमहा एक सेंटचे पटीत SIP करून नंतर मूर्त स्वरूपात हीऱ्याचा ताबा घेता येईल .अशा प्रकारची हीरा खरेदीची जगातील ही पहिलीच व एकमेव योजना आहे .येथे फक्त नैसर्गिकरीत्या उपलब्ध झालेल्या हीऱ्यांची खरेदी विक्री होईल त्यास जगप्रसिद्ध हीरा उत्पादक व विक्रेते De Beers ने 4C (Cut -पैलू ,Carat - वजन , Colour - रंग ,Clarity - पारदर्शी) ने प्रमाणित केलेले असेल MALCA याजगप्रसिद्ध हीरे कुरियर सेवेने त्याची पोच खरेदीदारास केली जाईल . बाजारात लोकांच्या मागणीनुसार भाव बदलत रहातील आणि आंतरराष्ट्रीय भावाचे आसपास कालांतराने स्थिरावतील ,पुरेशी पारदर्शकता या व्यवहाराना मिळेल . यामुळे दर्जेदार ,प्रमाणित हीरा खरेदी करणे सर्वसामान्यांना शक्य होणार आहे .भावात पडणाऱ्या फरकाचा लाभही (Trading)करून घेता येणेही शक्य आहे. सोने , चांदी , हीरे यातून मागील काही वर्षात मिळालेला उतारा हा अपवादात्मक परिस्थिती वगळता आकर्षक नाही. तरीही मोठ्या प्रमाणात हौशी आणि गुंतवणूकदार जगभर यात व्यवहार करीत असतात त्यामुळेच यातील भावनात्मक मुल्याची तुलना करता येणे अशक्य आहे .
©उदय पिंगळे
ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !
https://udaypingales.blogspot.in/?m=1
https://www.facebook.com/pingaleuday/.
हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .
No comments:
Post a Comment