भांडवलबाजार शिक्षण आणि
व्यवसायसंधी ......(भाग --२)
(मागील लेखावरून पुढे)
5)निक्षेपक /निक्षेपिका (Depositary &Depositary Participant ):ही सुविधा म्हणजे 21 व्या शतकातील गुंतवणूकदारांना मिळालेले वरदान आहे .यामूळे तांत्रिकदृष्ट्या कोणतीही गुंतवणूक कागद विरहित करणे शक्य झाले आहे . समभाग बाजारात याची टप्प्याटप्प्यांत आणि सक्तीने अमंलबजावणी झाल्याने व्यवहार सहज, सुलभ , सोपे,जलद आणि पारदर्शक झाले आहेत . गुंतवणूकदारास अत्यंल्प गुंतवणूक करणे यामुळे शक्य झाले असून ह्या अतिशय सोप्या वाटणाऱ्या पद्धतीत प्रवेश ,नोंदी , हिशोब , ऑडीट ,करविषयक माहिती , नेटवर्क , डी पी नेटवर्क , डी पी नूतनीकरण , आर्बिटरेशन , बॅकप ,पर्याय यंत्रणा अशा अनेक विभागांचा सामावेश होतो .यामधे सी ए , अकौंटंट , वकील, इंजीनियर ,संगणक तज्ञ नेटवर्कतज्ञ ,पत्रकार याशिवाय संगणकाची अगदी जुजबी ओळख असलेल्या सर्वाना संधी आहे या पद्धतीचे महत्व सर्वाना पटल्याने समभागाशिवाय रोखे ,यूनिट ,ई टी एफ ,बचत योजना पत्रे ,विमा प्रमाणपत्रे कमर्शियल पेपर , सर्टिफिकेट ऑफ डेपॉजिट आता इलेक्ट्रॉनिक पद्धतीने दिली घेतली जात आहेत .येथे काम पडणाऱ्या
प्रत्येकास डेपोसिटरी ऑपरेशन , रिस्क मॅनेजमेंट सर्टिफिकेशन पूर्ण करणे या किमान पात्रता आहेत , व्यक्तीगतरित्या डिपोसिटरी पार्टिसिपंट म्हणून काम करणे हा व्यवसाय होवू शकतो तर त्यांच्याकडे आपल्या क्षमतेनुसार नोकरी करणे हा एक पर्याय होवू शकतो .
6)मूलभूत विश्लेषक (Fundmental Anyalist): बाजारात मोठ्या प्रमाणात व्यवहार होत असल्याने स्पर्धात्मक युगात आधिकाधीक गुंतवणुकदार आपल्याकडे आकृष्ट करण्यासाठी विशिष्ट रितीने अभ्यास करून त्यातून काढलेले निष्कर्श जर बरोबर आले तर मोठ्या प्रमाणात व्यवसायसंधी वाढतात हे येथील दलाल ,बँका , अर्थसंस्था ,बँकेतर वित्तीय संस्था , एसेट मॅनेजमेंट संस्था या भागबाजारांच्या घटकांना माहीत झाले आहे .सी ए ,सी एस , एम बी ए (फायनान्स/अकौंटसी) असे शिक्षण घेतलेले असलेल्या व बाजारात करीयर करू इच्छिणाऱ्या सर्वाना मूलभूत विश्लेषक होण्याची संधी आहे मुंबई शेअर बाजाराने या संबंधिचा एक अभ्यासक्रम विकसित केला आहे .उपलब्ध साधनसामुग्रीचा वापर करून कोणत्याही कंपनीचे आंतरिक मूल्य शोधून काढणे ही एक कला आहे यानाच रिसर्च /सिक्युरिटी फायनांस एनालिस्ट असेही म्हणतात .यांचे काम शास्त्रावर आधारित आहे जोखिम /परतावा यांची चक्रवाढ पद्धतीने पृथकरण करून पैशाचे वर्तमान काळातील मूल्य व भविष्य मूल्य याचा विचार केलेला असतो यामूळे गुंतवणूकदाराची जोखिम कमी होते .Du pont या कंपनीने विकसित केलेल्या SWOT पद्धतींनी कंपनीचे बलस्थान , त्रुटी ,उपलब्ध संधी,संभावित धोके (Strength,Weekness ,Opportunity ,Threat) यामूळे गुंतवणूकीवरील परतावा (ROE : Return on Equity) काढणे सोपे झाले आहे . यामूळे अपेक्षित जोखिम व परतावा याबाबत अचूक अंदाज बांधणे सोपे होते .नेमके काय आणि कसे करायचे ,उपलब्ध आकडेवारी काय सूचवते यावरून अर्थबोधन करण्याची क्षमता असणे गरजेचे आहे .अनेक कंपन्या , बँका ,वित्तसंस्था ,एसेट मॅनेजमेंट कंपन्या ,दलाल यांच्याकडे उच्च वेतनमानाने सुरू होणाऱ्या नोकऱ्याची संधी आहे .याशिवाय फी आकारुन अशा प्रकारे स्वतंत्र व्यवसाय करता येणॆ शक्य आहे . nism कडून किंवा समकक्ष प्रमाणपत्र व सेबीकडे नोंदणी आवश्यक .
7) तांत्रिक विश्लेषक :(Technical Annyaalist) तांत्रिक बिश्लेषण हे मूलभूत विश्लेषणापेक्षा वेगळे असून मूलभूत विश्लेषक असा विचार करतात की बाजार हा जास्तीत जास्त तर्कावर तर काही प्रमाणात मानसिकतेवर आधारित आहे तर तांत्रिक विश्लेषकांच्या मते तो जास्तीत जास्त मानसिकतेवर आणि काही प्रमाणात तर्कावर आधारित आहे .त्यामुळे तांत्रिक विश्लेषकांचा भर हा शेअरबाजारातील स्थित्यंतरावर असतो यासाठी रेखाचित्रे आलेख यांचा अभ्यास केला जात असल्याने चार्टिस्ट असेही म्हणतात. पूर्वीचे वर्तन पायाभूत समजून भविष्यातील वर्तनाचा त्यांच्याकडून वेध घेतला जातो मोठ्या प्रमाणात खरेदीविक्री करणाऱ्या संस्था काही समभाग दीर्घ मुदतीसाठी तर काही अल्प मुदतीसाठी घेतात यातील अल्प मुदत आणि डे ट्रेडिंगसाठी तांत्रिक विश्लेषकाना उच्च वेतनाच्या नोकरीची संधी आहेत .तांत्रिक विश्लेषण आपण टाळू शकत नाही कारण भावात होणारी वट घट ही त्यामागील समूहांच्या एकत्रित मानसिकतेमुळे होते हे सर्वमान्य आहे .जे लोक नफा आणि नुकसान लीलया पचवू शकतात त्यांचे हे आधारस्तंभ आहेत .फी आकारणी करून हा स्वतंत्र व्यवसायही होवू शकतो .nism कडून याचा प्राथमिक आणि प्रगत असा अभ्यासक्रम पूर्ण करणे आणि सेबीकडे नोंदणी करणे आवश्यक आहे .
8)फंड व्यवस्थापक ( fund manager)शेअर बाजारात भारतीय आणि विदेशी वित्तसंस्था मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करीत असतात ही गुंतवणुक ज्या ऊद्धेशाने केली जाते .त्या प्रमाणे करणे करून देणे ,वेळोवेळी त्याचा आढावा घेणे ,कालानुरुप यात बदल करणे हे फंड व्यवस्थापकाचे काम आहे .तज्ञांच्या मोठ्या गटाचे तो नेतृत्व तो करीत असतो आणि अंतिम निर्णय घेवून एक पायंडा (Benchmark)पाडत असतो या कामाची व्याप्ती पोर्टफोलिओ मेनेजरहून जास्त असून फायनान्समध्ये उच्च शिक्षण घेतलेल्या व्यक्तींना नामवंत फंड मेनेजरचे सहायक म्हणून सुरुवात करून साधारण तीन वर्षाच्या अनुभवाने स्वतंत्र व्यवसाय अथवा नोकरीच्या संधी आहेत .
9)संपत्ती व्यवस्थापक (Assets Manager): म्यूचुअल फंड ,समभाग संलग्न विमा योजना ,पेन्शन फंड हे गुंतवणूकदाराचे वतीने बाजारात गुंतवणूक करीत असतात ही गुंतवणूक करण्यासाठी विश्वस्त संस्था स्थापन करावी लागते ते विविध योजना बाजारात आणतात .अशा योजना आखणे , सेबीची परवानगी घेणे ,प्रारंभिक विक्री करून जमा रकमेची योजना उद्देशानुसार कार्यान्वित करणे , कायदेशीर तरतुदीप्रमाणे nav जाहीर करणे विविध अहवाल तयार करणे ,तक्रार निवारण यंत्रणा उभी करणे ,खर्च कमीशन यांची माहिती देणे या सारखी कामे वेळेत आणि तत्परतेने करणे जरुरीचे असते अतिशय जोखमीचे काम असल्याने उच्च शैक्षणिक पात्रता आणि काही वर्षाचा सहाय्यक व्यवस्थापकाचा अनुभव असणे गरजेचे आहे .हे फार जबाबदारीचे काम असल्याने त्याचे वेतनमान साजेसे आणि उच्च असते .
10)माहिती संकलन (Deta Bank) : शेअर बाजारात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या सर्वांची मार्गदर्शनाची गरज डेटा बँक आणि रिसर्च कंपनीद्वारे पूर्ण होऊ शकते . उपलब्ध आकडेवारीच्या सहायाने संशोधनात्मक अहवाल तयार करणे हे जिकिरीचे काम आहे . कोणताही निर्णय घेण्यापुर्वी त्याचा इतिहास पहाणे गरजेचे असते . शेअर बाजार सतत भविष्याचा वेध घेत असेल तर या क्षेत्राची भूतकाळातील कामगिरी ही पथदर्शक ठरते उदाहरणार्थ अन्य कोणत्याही गुंतवणूक प्रकारपेक्षा समभाग गुंतवणूक ही जास्त फायदेशीर आहे हे सांगणे संकलित केलेली माहिती आणि त्याद्वारे काढलेला निष्कर्ष यामूळे सहज समजू शकते .ही सर्व माहिती गोळा करणे त्याची नोंद ठेवणे आणि त्यातून अनुमान काढणे यासाठी अचुकतेने काम करणाऱ्या व्यक्तीची गरज लागते .ही आकडेवारी अहवाल मोबदला घेवुन व्यक्ति आणि संस्था यांना पुरवले जातात एका अर्थी गुंतवणूकीचा डेटा बँक हा कच्चा माल आहे .हे काम पूर्णवेळ किंवा अर्धवेळ करता येवू शकते कामाचे निश्चित स्वरूप आणि आवाका यावर डेटा कंपनीचा मोबदला अवलंबून असतो .ठोक स्वरूपात हे काम स्विकारले तर घरी बसूनही करता येवू शकते .यासाठी संगणकावर वेगाने व अचुकतेने काम करण्याचा सराव असणे जरुरीचे आहे .(अपूर्ण)
©उदय पिंगळे
ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !
https://udaypingales.blogspot.in/?m=1
https://www.facebook.com/pingaleuday/.
हा लेख आणि यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर आहे .

No comments:
Post a Comment