एन आई एस एम (National lnstitute of Securities Management)
पूर्वार्ध
NISM ही सेबीने (Securities &Exchange Board of India)
2006 साली स्थापना केलेली शैक्षणिक संस्था असून ती भारतीय सार्वजनीक विश्वस्त संस्था म्हणून नोंदली आहे .या संस्थेकडून भांडवलबाजारास आवश्यक शैक्षणिक अभ्यासक्रम , कार्यशाळा,कौशल्ये विकसित होण्यासाठी विविध प्रयत्न केले जातात .सर्वसाधारण अर्थसाक्षरता वाढावी यासाठी अनेक शैक्षणिक सुविधा संस्थेकडे आहेत .संस्थेचे मुख्य कार्यालय वाशी नवी मुंबई येथे असून 72 एकर जागेवर पाताळगंगा (मुंबई पासून 65कि मी अंतरावर नविन दृतगती मार्गानजीक) येथे सुसज्ज शैक्षणिक संकुल असून अलीकडेच ते सुरू झाले .ही संस्था पूर्णपणे स्वायत्त असून संस्थेच्या संचालक मंडळाचे मार्गदर्शनाने तीचे कामकाज चालते .संस्थेचे सहा शैक्षणिक विभाग खालीलप्रमाणे :
A)School for Securities Education : या विभागामार्फत पूर्ण वेळेचे भांडवल बाजाराशी संबधित खालील अभ्यासक्रम आहेत .
1)Post Graduate Diploma in Management (Securities Markets)
2)Post Graduate Program in Securities Markets
3)Post Graduation Diploma in Quntitative Finance
खालील अभ्यासक्रम अर्धवेळ आहेत
1)Post Graduate Diploma in Data Science
2)Certificate in Securities Law
3)Certificate in Treasury Management
4)Post Graduation Diploma in Financial Engineering & Risk Management
अल्प मुदतीचे अभ्यासक्रम
1)Summer School 2017
2)Post Graduate Certificate in Securities Market
3)Post Graduate Certificate in Capital Market
4)NISM Certified Course in Securities Market
5)NISM- VES lnvestment Adviser Program
6)NISM IMART Certificate Course in Securities Market
B)School for Investor Education & Financial Literary :या विभागामार्फत अर्थसाक्षरता वाढीस लागावी यासाठी
1)शाळांमधे आर्थिक विषयाचे शैक्षणिक उपक्रम
2)अर्थसाक्षरतेचे विषयी ncfeindia.org ह्या स्वतंत्र संकेतस्थळाची निर्मिती ,वेळोवेळी त्याचे नूतनीकरण .
3)विविध शहरे ,गावे यामधुन अर्थ साक्षरता विषयक कार्यशाळा
C)School of Certification of Intermediate :भांडवल बाजाराशी संबधित सर्व घटकांना आपल्या कामासंबंधी प्राथमिक गोष्टींची किमान माहिती होण्यासाठी सेबीच्या नियमानुसार आवश्यक अशी पात्रता पूर्ण करण्यासाठी या परीक्षा देणे जरुरीचे आहे .या परीक्षा देण्यासाठी वय आणि शिक्षण याबाबत कोणतीही अट नसून पर्यायी स्वरूपात उत्तरे देणे अपेक्षित असते .प्रश्न आणि पर्याय
समजेल एवढे ज्ञान आणि उत्तर निवडता करता येईल इतके संगणकज्ञान असणे जरुरीचे आहे .या परीक्षा ऑनलाइन होतात आणि ताबडतोब निकाल मिळतो .प्रथम नोंदणी करून अभ्यासक्रम निवडावा लागतो . नोंदणीसाठी आधार क्रमांकाची गरज असते . अभ्यासक्रम नोंदवल्यावर स्वयं अध्ययनासाठी लागणारे साहित्य ऑनलाइन मिळते परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी 50/60% गुण मिळवणे जरुरीचे असून त्याची वैधता 3 वर्ष असते परीक्षांचे माध्यम इंग्रजी असून काही परीक्षा हिंदी / गुजराथी माध्यमातुनही देता येतात .पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण न झाल्यास परीक्षा फी भरून अजून दोनदा परीक्षा देता येते . भांडवलबाजाराचे संबधित कोणतीही नोकरी अथवा व्यवसाय करण्यासाठी किमान एवढी पात्रता परिपूर्ण करावीच लागते .भरलेल्या फीमध्ये एक सराव परीक्षाही देता येते .नोंदणी केल्यापासून 180 दिवसाचे आत देशभरातील 150 हून अधिक ठिकाणी असणाऱ्या कोणत्याही केंद्राची निवड करून परीक्षा देता येते . दोन तास (Common Derivatives Certification तीन तास 150प्रश्न 150 गुण ) चालणारी ही परीक्षा 50/100 बहुपर्यायी प्रश्न स्वरूपात असून योग्य उत्तर निवडायचे असते . काही परीक्षामधे चुकीच्या उत्तराकरीता 25% गुणकपात होते .या अभ्यासक्रमाची फी ₹ 1000 ते 3000 या दरम्यान आहे .माफक फी मुळे कोणीही गुंतवणूकदार या परीक्षा देवून व्यवसाय आणि नोकरीच्या किमान पात्रता धारण करू शकतो . तर सध्या भांडवल बाजारात कार्यरत व्यक्ति त्याला प्राप्त झालेल्या ज्ञानाने अधिक उच्च दर्जाची सेवा देवू शकते .या शिवाय एक सुजाण गुंतवणूकदार बनून या ज्ञानाचा स्वतःच्या गुंतवणूकीचे निर्णय घेण्यास उपयोग होतो यामुळे शक्य असेल त्या सर्वानीच ते गुंतवणुक करीत असलेल्या गोष्टीशी संबधित परीक्षा देणे म्हणजे ज्ञानात केलेली गुंतवणुक आहे असे म्हणता येईल .सध्या उपलब्ध असलेले बावीस प्रमाणपत्र अभ्यासक्रम खालील प्रमाणे :---
1)NISM Series 1:Currency Derivatives Certification Exams
2)NISM Series 2A: Registrar & Transfer Agent (Corporate) Certification Exams
3)NISM Series 2B: Registrar &Transfer Agent (Mutual Fund) Certification Exams
4)NISM Series 3A: Securities lntermediaries Compliance (Non Fund) Certification Exams
5)NISM Series 3B: lssuers Compliance Certification Exams *
6)NISM Series 4: Interest Rates Derivatives Certification Exams
7)NISM Series 5A: Mutual Fund Distributors Certification Exams
8)NISM Series 5B: Mutual Fund Foundation Exams.
9)NISM Series 5C: Mutual Fund Distributors (Leval-2) Certification Exams.*
10)NISM Series 6: Depositary Operatons Certification Exams.
11)NISM Series 7: Securities Operations & Risk Management Certification Exams.
12)NISM Series 8: Equity Derivatives Certification Exams.
13) NISM Series 9: Merchant Banking Certification Exams.
14)NISM Series 10A: Investment Adviser (Leval -1) Certification Exams.
15)NISM Series 10B: Investment Adviser (Level -2) Certifiation Exams.
16)NISM Series 11: Equity Sells Certification Exams.*
17)NISM Series 12: Securities Market Foundation Exams.*
18)NISM Series 13: Common Derivatives Certification Exams.
19)NISM Series 14: Internal Auditors for Stock Brokers Certification Exams.*
20)NISM Series 15: Reserch Analist Certification Exams.
21)NISM Series 17:
Retirement Advicers Certification Exams.
22)IBBI Limited Insolvency Certification Exams.
*अशी खूण असलेले अभ्यासक्रम पूर्ण केले पाहिजेत अशी सेबीची सक्ती नाही .हे अभ्यासक्रम सामान्य ज्ञान वाढावे यासाठी सर्वांसाठी असून ते प्रामुख्याने विद्यार्थी ,शिक्षक ,गृहिणी यांना उपयुक्त आहेत .(उत्तरार्ध उद्या प्रसारित केला जाईल. अधिक माहितीसाठी : www.nism.ac.in या संकेतस्थळाला भेट द्यावी)
©उदय पिंगळे
ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !
https://udaypingales.blogspot.in/?m=1
https://www.facebook.com/pingaleuday/.
हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .

No comments:
Post a Comment