भांडवलबाजार शिक्षण आणि व्यवसायसंधी ..........(भाग -३)
(मागील लेखावरून पुढे )
11)संशोधन संस्था (Research Company): या कंपन्या डेटा बँकेने जमवलेली माहिती तयार केलेले अहवाल यावरून जोखिम(Risk) व परतावा (Return)याचा अंदाज बांधून आपला अहवाल देतो .पूर्वीचे जे अंदाज चुकीचे ठरले त्याचा चिकित्सक विचार करतो .हे काम अत्यंत बुद्धिमत्तेचे असून असे कार्य करणाऱ्या संशोधकास सुसज्ज कार्यालय असून अनेक आधुनिक सोईसुविधा उपलब्ध असतात . आर्थिक ,मूलभूत व तांत्रिक अशा सर्व प्रकारचा अभ्यास करून देशातील स्थिति आणि जागतिक परिस्थिती यांचा विचार करून या तिन्ही प्रकारचे अहवाल संशोधकांकडून प्रकाशित केले जातात .जगभरात सर्वत्र त्याची दखल घेतली जाते .आर्थिक विषयाची पदव्युत्तर पदवी किंवा डॉक्टरेट आणि 10 वर्षाचा अनुभव संशोधकास आवश्यक आहे .
12)मध्यस्थ (Arbitrager): शेअर बाजारांच्या संदर्भात मध्यस्थ हा एकमेव व्यवसाय आहे ज्यासाठी केवळ ज्ञान हेच भांडवल लागते आणि या व्यवसायात तोटा होत नाही .विशिष्ट कंपनीच्या दोन बाजारातील बाजारभावातील तफावत दूर करण्याचे काम हा मध्यस्थ करीत असतो समभाग व डेरीव्हेटिव्हमधील आर्बिट्राजर हा असा व्यवसाय आहे येथे कायम नफाच आहे जोखिम न स्वीकारता केला जाणारा असा हा अपवादात्मक व्यवसाय असून येथे कौशल्याप्रमाणे अधिकाधिक नफा कमवण्याची हमी आहे . बाजारातील तेजी अथवा मंदीकडे ध्यान न देता आर्बिट्राजरला फक्त तफावत शोधून आपल्याकडे घ्यायची असते .बाजारातील व्यवहारांचे पूर्ण ज्ञान ,संगणकावर जलदगतीने मागणी टाकण्याचे आणि असलेल्या संधीचा फायदा करून घेण्याचे तंत्र जमणे आवश्यक आहे .अनेक दलाल , मोठे गुंतवणूकदार आणि संस्था यांनी आपले आर्बिट्राजर नेमले असून त्यांचे भांडवल आणि आर्बिट्राजरचे कौशल्य असे असल्यास नफ्यातील काही टक्के हिस्सा आर्बिट्राजरला मिळतो . NISM कडील डेरिव्हेटीव्हजचे किंवा समकक्ष प्रमाणपत्र असणे जरूरी आहे .
13)डेरिव्हेटिव्हज (Derivetives): मुंबई शेअर बाजारात यापूर्वी असलेल्या वायदा कराराची 'बदला'(हे या व्यवहाराचे नाव आहे.त्याचा हिंदी चित्रपटातील बदल्याशी काही संबध नाही) ही पद्धती ती बदलून नवीन फ्युचर आणि ऑप्शन या माध्यमातून भविष्यकालीन सौदे सुरू झाले .हे सौदे मूळ किंमतीला आधारभूत धरून केले जातात यामुळे काही अंशी बाजारातील चढ उतारावर ताबा रहातो .हे व्यवहार समभाग ,वस्तू ,चलन आणि अन्य मालमत्तेत केले जावू शकतात . ज्यावेळी मोठ्या वित्तीय संस्था व सहभागिदार मोठ्या प्रमाणात याद्वारे व्यवहार करू लागले तेव्हा जोखिम व्यवस्थापन नीट व्हावे म्हणून हेजिंग करण्यासाठी याचा वापर होऊ लागला .फ्यूचरमधे भविष्यकाळातील जोखिम स्वीकारलेली असते ऑप्शनमधे अधिमुल्य (Premium)देवून ती मर्यादीत केली जाते .म्यूचुअल फंड ,विदेशी वित्तसंस्था ,देशी वित्तसंस्था,मोठे वैयक्तिक गुंतवणूकदार आणि काही धाडसी लोक मोठया प्रमाणात हे व्यवहार करत असतात. यापैकी म्यूचुअल व विदेशी वित्तसंस्था यांना फक्त हेजिंगसाठी असे व्यवहार करण्यास परवानगी आहे. बाजारातील एकूण व्यवहारांच्या 80% हून अधिक व्यवहार डेरिव्हेटीव्हज मधे होत असल्याने यामधील तज्ञ व्यक्तिंना संधी आहे NISM कडून समभाग (Equity) वस्तू (Commodity) परकीय चलन (Forex) यातील वेगवेगळे तसेच सर्वांचे संयुक्त प्रमाणपत्र असलेले त्याचप्रमाणे BSE /NSE यांचे डेरिव्हेटीव्हजवरील प्रमाणपत्र मिळवणे आणि अनुभव घेवून यामधे प्राविण्य मिळवणे जरूरी आहे.यातील एक व्यवहार हा किमान पाच लाखहून रुपयांहून अधिक मूल्यांचा असल्याने, यामधे नफा अधिक असला तरी भांडवल पूर्णपणे गमावून स्वतः कडील काही पैसे भरावे लागण्याचा मोठा धोकाही आहे .या करारामधे अनेक गुंतागुंतीच्या मुद्यांवर एकत्रित विचार केला जात असतो ,तेव्हा हे व्यवहार कसे होतात ते माहिती करून घेणे आणि प्राविण्य मिळवण्यासाठी जाणकारांकडे उमेदवारी करणे हे मार्ग आहेत .या व्यवहारांना एक्चेंजची हमी असल्याने व्यक्तिव्यक्तिंमध्दे होणाऱ्या भविष्यकालीन सौद्यांपेक्षा हे करार वेगळे आहेत .
14)आर्थिक गुन्हे (Crimes ) अन्वेषक : आर्थिक क्षेत्रात सुरळीत व्यवहार होण्यास नियम आहेत . अनेक लोकांनी सखोल विचार करून ते बनवले आहेत .परंतु गुन्हेगार यांपेक्षा हुशार असून त्यांना शोधून काढून शिक्षा देण्यास मदत करणे हे त्याहून बुद्धिमत्तेचे काम आहे .या क्षेत्रातील व्यवहार तज्ञ ,कायदेशीर ज्ञान असलेले आणि गुन्हेगारांच्या मानसिकतेचा विचार करू शकणारे या सर्वाना येथे संधी असून अशा व्यक्तिंची संस्था ,सरकारी यंत्रणा , सेबी यांना अशा लोकांची नियमीत मदत होवू शकते .हे काम कंत्राटी पद्धतीने चालत असून त्याचे स्वरुप व व्यापकतेप्रमाणे उच्च मोबदला मिळू शकतो .
15)आर्थिक नियोजक (Financial Planners): नियोजनास पर्याय नाही .आर्थिक नियोजक हा फी आकारुन उपलब्ध निधीचा उद्दिष्टानुसार कसा वापरता येईल ,त्याचे अंदाज पत्रक कसे असावे ,जोखिम व्यवस्थापन ,कर मार्गदर्शन , मालमत्तेचे नियोजन ,निवृत्तीनंतरचे नियोजन याविषयीच्या व्यक्तीगत गरजा लक्षात घेवून मार्गदर्शन करतो हा व्यवसाय वेतनासह /शिवाय अथवा कमीशन घेवून करता येवू शकतो .
समारोप : ही यादी परिपूर्ण नाही याशिवाय भागबाजारशी संबंधी अनेक व्यवसाय आहेत . उदा . प्राथमिक बाजार ,दुय्यम बाजारासंबधी कामे ,बाजार सुरू व बाजार बंद झाल्यावर करायची कामे ,अकाउंटीग ,तपासणी , विविध प्रसारमाध्यमे ,पत्रकारिता विविध कार्यक्रमाचे आयोजन , मुलाखती , स्थानिक व जागतीक बाजारातून निधी गोळा करणे , कार्यालयीन प्रशासन यासंबंधी अनेक व्यवसाय संधी आहेत .या संधींचे सोने करण्यासाठी नोंदणी आणि किमान पात्रता प्रमाणपत्र आवश्यक आहे . यातील कोणतेही काम दुय्यम नाही ,यांच्यातील सुसंवादाने बाजार सुरळीत चालतो .यातील अनुभव घेवून महत्वाकांक्षी लोकांना यासंबंधीच्या व्यवसायसंधी जगभर उपलब्ध आहेत कारण थोड्याफार फरकाने जगभरात याच पद्धतीने सर्व व्यवहार चालतात . तेथे कंपनीचे नाव आणि चलन वेगळे असते एवढाच काय तो फरक . मागील तीन लेखातून काही व्यवसायांची ओझराती ओळख करून घेत असताना लेखन खूप लांबत चालले आहे . तरीही थोडक्यात जास्तीत जास्त परिपूर्ण माहिती आपल्याकडे पोहोचवण्याचा हा प्रयत्न .यातून कुणाला प्रेरणा मिळू शकली तर अधिक आनंद होईल . तेव्हा इथेच क्षणभर थांबूया .(समाप्त)
©उदय पिंगळे
ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !
https://udaypingales.blogspot.in/?m=1
https://www.facebook.com/pingaleuday/.
हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे ,त्यास जरूर प्रतिसाद द्या .

No comments:
Post a Comment