ब्रकेट ऑर्डर्स आणि कव्हर ऑर्डर्स (Bracket Orders & Cover Orders)
काही दिवसांपूर्वी गुंतवणूकदारांचे प्रकार , समभाग खरेदी /विक्रीच्या ऑर्डर देण्याच्या पद्धती या विषयावर लेख लिहिले होते. या विषयाची थोडीशी उजळणी करुयात. व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने बाजारात अनेक गुंतवणूकदार वेगवेगळ्या हेतूने गुंतवणूक करीत असतात. अधिकाधिक फायदा मिळवणे हा सर्वांचा मुख्य हेतू असला तरी तरी तो मिळवण्याची स्वतःची एक पद्धत असते. काहींना दीर्घकाळात मोठा नफा हवा असतो तर काहींना अल्पकाळात नफा हवा असतो. आयकराच्या दृष्टीने अल्प /दीर्घकाळ म्हणजे काय हे ठरवण्यात आले असले. तरी प्रत्येकाच्या मनातल्या त्यांच्या व्याख्या निरनिराळ्या आहेत.
समभाग त्याच दिवशी घेवून विकणारे कींवा आधी विकून नंतर खरेदी करणारे यांना डे ट्रेडर असे म्हणतात. हे लोक कोणत्याही प्रकारच्या डिलिव्हरी व्यवहाराचे सौदे करीत नाहीत. त्यादिवशीच्या नफा /तोट्याचा त्याच दिवशी हिशोब होत असल्याने दलाली (Brokerage) कमी पडते. याशिवाय त्यांना नफा होवूदे अथवा नुकसान एकूण उलाढाल वाढल्याने किमानदराने कमाल कमिशन मिळवण्याची संधी यातून दलालांना मिळत असल्याने त्यांच्याकडे असलेल्या रकमेच्या काही पट (किती पट ही माहिती ब्रोकर कडून घ्यावी कारण अशी परवानगी देणे न देणे हे फक्त त्यांच्या हातात आहे ) उलाढाल करून देण्याची त्यांना परवानगी दिली जाते. याला मार्केट ऐक्पोजर असे म्हणतात. या मर्यादेतच उलाढाल करता येते. यामध्ये गुंतवणूकदारापेक्षा ब्रोकरकडे जोखिम कमी आहे .
फायदा मिळवणे आणि अधिक नुकसान टाळणे यासाठी भावातील फरकावर बारकाईने लक्ष ठेवून , नफ्यातोट्याचे गणित करून झटपट निर्णय घ्यावा लागतो. याशिवाय त्याची अंमलबजावणीही त्वरित करावी लागते. हे करतानाच काही तांत्रिक अडचणी येवू शकतात. यातील एक लहानशी चूक मोठे आर्थिक नुकसान करू शकते. या जोखीम व्यवस्थापनासाठी ब्रकेट ऑर्डर्स (Bracket Orders) आणि कव्हर ऑर्डर्स ( Cover Orders) उपयुक्त आहेत.
ब्रकेट ऑर्डर्स : य़ा प्रकारची ऑर्डर्स खरेदी / विक्रीस टाकली असता मुख्य ऑर्डर एक्जिक्युट झाली की त्याचबरोबर ट्रिगर आणि स्टॉपलॉस या दोन ऑर्डर आपोआप टाकल्या जातात. ट्रिगर ऑर्डरने योग्य
भाव आल्यावर खरेदी /विक्री करून नफा मिळवला जातो अथवा तोटा होण्याची शक्यता असल्यास स्टॉपलॉस ऑर्डरमूळे मर्यादित केला जातो. यापैकी कोणतीही एक ऑर्डर पूर्ण झाली की दुसरी आपोआपच रद्द होते. ट्रिगर आणि स्टॉपलॉस यांच्या किंमती मुख्य ऑर्डर्स टाकताना टाकाव्या लागतात. यानंतर सदर शेअरच्या भावात होणाऱ्या फरकाकडे बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज नसते. यामुळे आपण ठरवलेला नफा मिळू शकतो अथवा तोटा जोखीम घेण्याच्या मर्यादेत रहातो.
कव्हर ऑर्डर्स : ही वरील प्रमाणेच ऑर्डर्स आहे यात ट्रिगर लावला जात नाही फक्त स्टॉपलॉस लावला जातो यामुळे तोटा मर्यादीत रहातो. फायदा करण्यासाठी अपेक्षित भाव आल्यावर उलट सौदा (Reverse order) करण्यासाठी ऑर्डर नव्याने टाकावी लागते आणि त्यासाठी शेअरचे भावावर सतत लक्ष लागते.
भाव सतत खालीवर होत असल्याने यातील संधीचा फायदा घेण्यासाठी डे ट्रेडर्सना भावावर लक्ष ठेवावे लागते यामध्ये व्यक्तीकडून चूक होण्याची शक्यता असते. ब्रकेट ऑर्डर व कव्हर ऑर्डरमुळे ऑर्डर आधीच टाकली गेल्यामुळे चूक होण्याची शक्यताच नसते. ऑर्डर पूर्ण होईपर्यत जर काही त्यात बदल करायचा असेल तर तो करता येतो. मात्र एकदा का सौदा झाला की त्यात बदल करता येत नाही.
©उदय पिंगळे
ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !
https://udaypingales.blogspot.in/?m=1
https://www.facebook.com/pingaleuday/.
हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .

No comments:
Post a Comment