डे ट्रेडिंग (Day Trading)
मागील एका लेखात आपण गुंतवणूकदारांचे विविध प्रकार पाहिले होते. प्रामुख्याने तांत्रिक गोष्टींचा (चार्ट , वॉल्यूम , दरातील चढ उतार ) विचार करून एखादा शेअर वाढेल की कमी होईल याचा अंदाज बांधून , त्याच दिवशी कमीत कमी भांडवलावर जास्तीत जास्त नफा मिळवण्याची अपेक्षा बाळगणाऱ्यास डे ट्रेडर असे आपण म्हणतो. हे लोक विविध आलेख आणि त्यातून बनणाऱ्या विविध रचना यांचा आधार अंदाज बांधण्यासाठी घेत असल्याने त्याना चार्टिस्ट असेही म्हणतात.
बहुतेक सर्वच गुंतवणूक सल्लागार कोणालाही डे ट्रेडिंग करण्याचा सल्ला देत नाहीत. असे व्यवहार करणे ते दुय्यम दर्जाचे समजतात. असे असले तरी सध्या खूप मोठ्या प्रमाणावर असे व्यवहार होत आहेत. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने बाजार चालू झाल्यापासून सर्वव्यवहार अतिशय सोपे आणि अधिक पारदर्शक झाले आणि त्यातून फायदा मिळवण्याच्या अनेक संधी निर्माण झाल्या. त्यामुळे उलाढाल प्रचंड प्रमाणात वाढली असून मोठया प्रमाणात सट्टेबाजही त्यास हातभार लावीत आहेत. खूप मोठया प्रमाणातील व्यवहार विहित काळात पूर्ण होत आहेत. व्यवसाय मिळवण्यासाठी , तो टिकवण्यासाठी जोरदार स्पर्धा सुरू झाली असून ब्रोकरेज कमी करणे , अधिक ऐक्पोजर देणे यातून अनेक नवीन गुंतवणूकदार बाजारकडे आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. खाजगीकरण , उदारीकरण आणि जागतिकीकरण यातील अनेक घटकांचा बाजारावर परिणाम होवू लागला आहे. सध्या ऎकून उलाढालीच्या 70% हून अधिक व्यवहार डे ट्रेडिंगचे होतात. कोण आहेत हे ट्रेडर ? यात देशी /विदेशी वित्तसंस्था आहेत त्याचप्रमाणे मोठे गुंतवणूकदार आणि सर्वसाधारण लोकही आहेत. किमान भांडवलावर अधिकाधिक फायदा मिळवणे हा त्यांचा महत्वाचा उद्देश आहे. डे ट्रेडिंग करणाऱ्या अनेकांशी चर्चा केल्यावर माझ्या असे लक्षात आले की वैयक्तिक गुंतवणुकीदारांपैकी फारच थोडे लोक डे ट्रेडिंग हे व्यवसायिक पद्धतीने करतात आणि फारच थोड्या लोकांची त्यांची त्यांची स्वतःची अशी एक पद्धत आहे. अन्य लोक यात येतात काही व्यवहारात फायदा झाला की आपल्याला खूप काही समजायला लागले असे समजून अधिक मोठे व्यवहार करायला जातात आणि नुकसान करून घेतात. मोठे नुकसान झाले की आपोआप बाहेर पडतात. तोपर्यंत नवीन लोक बाजारकडे आकर्षित झालेले असतात ते आपले व्यवहार करणे चालू करतात. एकंदर हे चक्र असेच चालू राहिल्यानंतर यामध्ये सर्वसाधारण गुंतवणूकदार आपले बरेच नुकसान करून घेतात. अनेक लोक वर्षानुवर्ष डे ट्रेडिंग करतात पण ते आपण कसे ट्रेडिंग करतो ? हे निश्चित सांगू शकत नाहीत. काही जण त्यांच्या मनाला वाटेल त्याप्रमाणे आणि तसे व्यवहार करतात. काहीजण निव्वळ टाईमपास म्हणून ट्रेडिंग करतात. काहीजण विविध आर्थिक वाहिन्यांवरील चर्चा ऎकून ट्रेडिंग करतात. तर काहीजण केवळ टिप्सवर व्यवहार करतात. काही जण फक्त एक किंवा दोनच शेअर्स मध्ये व्यवहार करायचा असे ठरवून सौदे करतात. आपण केलेल्या व्यवहारांचे ते तटस्थपणे मूल्यमापन करू शकत नाहीत. आपण कोठे चुकलो आणि काय करायला हवे होते याचा शोधबोध न घेतल्याने वारंवार त्याच चूका पुन्हापुन्हा करीत रहातात. फायदा करून घेणे सर्वांनाच आवडते मांत्र तोटा करून घेण्याची मानसिकता त्यांच्याकडे नसते. याउलट मोठे गुंतवणूकदार , देशी / विदेशी वित्तसंस्था या तंत्रज्ञानाच्या आणि तज्ञांच्या मदतीने कोणती पद्धत वापरली तर डे ट्रेडिंग फायदेशीर ठरेल याचा अभ्यास करून निर्णय घेवून मोठ्या प्रमाणात फायदा मिळवू शकतात. काही व्यवहारात तोटा झाला तरी सहन करू शकतात तसेच त्यावर कशी मात करायची त्याची उपाययोजना करू शकतात. असे असले कोणीही कोणत्याही पद्धतीने व्यवहार केले तरी फक्त फायदाच होईल असे नाही. यशस्वी ट्रेडरना तोटा होत नाही असे नाही.
काही वर्षापूर्वी मी ही अगदीच बाळबोध पद्धतीने ट्रेडिंग करीत होतो म्हणजे मी 95% व्यवहार त्याच दिवशी पूर्ण करीत होतो म्हणून त्याला डे ट्रेडिंग म्हणायचे एवढेच. यात मला फायदा झाला असला तरी तुलनेने अधिक रक्कम गुंतवावी लागत होती. यातूलनेत माझ्याशी अलीकडेच मैत्री झालेले नितीन पोताडे यांनी अधिक शास्त्रशुद्ध पद्धत शोधून काढली आहे असे मला वाटते. ते स्वतः आर्थिक विषयात उच्च शिक्षण घेतलेले असून याच क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव घेवून नंतर नोकरी सोडून गेले आठ वर्ष केवळ व्यवसाय म्हणून डे ट्रेडिंग करीत आहेत. तेव्हा अशा अनुभवी व्यक्तीच्या ज्ञानाचा फायदा आपण सर्वांनी करून घेतला पाहिजे. त्यांनी एक ट्रेंडिंग आणि गुंतवणुकीसाठी उपयुक्त अशी फाईल बनवली आहे त्यामध्ये निफ्टी २०० इंडेक्स मध्ये असलेल्या २०० स्टॉक्सच्या ट्रेडिंगचा दिवस धरून १८ दिवसाच्या डेटाचा वापर करून कोणते स्टॉक्सच खरेदी साठी योग्य आहेत आणि कोणते स्टॉक्स विक्री साठी योग्य आहेत यावर निर्णय घेण्यासाठी मदत करतील. ट्रेडिंगच्या दिवशी असलेला भाव हा मागील १८/१५/१२/९/६/३ दिवसाचा उच्चतम किंवा न्यूनतम भाव आहे का हे चालू मार्केट मध्ये पाहता येईल. दाऊ (Dow) थियरी हा याचा आधार असून त्यावरील नियमाला अनुरूप स्टॉकची फक्त लिस्ट दिसेल त्यामुळे पुढील काम लवकर सुरु करता येईल. ही फाईल निशुल्क आणि फुल्ली ऑटोमॅटिक असून गूगल फिनान्स कडून मिळणाऱ्या डेटावर आधारित आहे. ही फाईल पाहण्याची लिंक पुढीलप्रमाणे - https://goo.gl/KkavMT याच थियरीस अनुसरून त्यांची दुसरी फाईल ही ८०० स्टॉक्सच्या ५० दिवसाच्या डेटाचा वापर करून कोणते स्टॉक्स स्विंग हाय किंवा स्विंग लो जवळ किंवा त्यापलीकडे गेले आहेत त्या स्टॉक्सची लिस्ट दिसेल. ही फाईल सशुल्क आणि सेमी ऑटोमॅटिक आहे. त्याच्या माहितीसाठी थेट त्यांच्याशीच संपर्क साधावा.
या फाईल्सचा वापर स्टॉक निवडीसाठी आणि खरेदी / विक्री निर्णय घेण्यासाठी होतो. जर तुमचे स्टॉक सिलेक्शन सुयोग्य नसेल तर तुम्ही कितीही हुशार ट्रेडर असाल तरी फारसे काही करू शकणार नाही. यामध्ये ट्रिगर प्राईज काय असेल ? आणि स्टोपलॉस किती असावा ? हे ट्रेडरने आपल्याकडील पैसे , जोखीम घेण्याची तयारी आणि अनुभव यावरून स्वतः ठरवावे. शिस्त , विश्वास , संयम , गुंतवणूक निधीचा कल्पक वापर आणि ज्ञान ही यशस्वी ट्रेडरची किंवा कोणत्याही गुंतवणूकदाराची पंचसूत्री म्हणता होईल. ट्रेडिंगच्या त्रिकोणात महत्वाचे असे विश्वास (trust) , तंत्र (technich) आणि ताणतणाव (tension) हे तीन टी महत्वाचे असून असून , यातील किमान tension ठेवून, trust आणि technic वर कमाल विश्वास असावा लागतो. त्याचप्रमाणे आपण आपणास योग्य वाटते त्या पद्धतीने ट्रेडिंग करतो याचा अभिमान असणे जरूरीचे आहे.
ही पद्धत आपल्याला नक्की समजली असेल तर ती योग्य वाटते का ? हे डे ट्रेडरने स्वतः ठरवावे. प्रथम पेपर ट्रेड , मग छोटे ट्रेड आणि मोठे ट्रेड अशी प्रगती करीत जावे. आपण हे करू शकतो याची खात्री पटल्यावरच ट्रेडिंग करावे. मागील लेखात उल्लेख केल्याप्रमाणे ब्रकेट ऑर्डर टाकावी यामुळे टार्गेट आणि स्टॉपलॉस आधीच निश्चित केल्याने यातील भावनिक गुंतवणूक कमी होईल आणि आपली अन्य कामे आपण मुक्तपणे करू शकू. नितीनजी या पद्धतीचा प्रचार आणि प्रसार विविध माध्यमांतून करीत आहेत त्यामुळे ते खूप बिझी असतात ,ही पद्धत अधिक चांगली आणि सोपी कशी होईल याविषयी सूचना असतील किंवा काही शंका असतील तर स्वतः त्यांच्याशी वैयक्तिकरित्या संपर्क साधावा. त्याची योग्य ती दखल घेतली जाईल. या पद्धतीचे तंत्र समजले आणि अनेकांनी त्याप्रमाणे व्यवहार करण्यास सुरुवात केली तर ओघाने उलाढाल वाढेल आणि त्यातून सर्वांचा आपोआप फायदाच होईल असा विश्वास वाटतो.
©उदय पिंगळे
विशेष सूचना : डे ट्रेडिंगच्या या पद्धतीची प्राथमिक माहिती व्हावी या उद्देशाने ट्रेडरना आणि गुंतवणूकदाराना स्वयंअध्ययनासाठी वरील लेख लिहीला आहे. ही पद्धत विकसित करणारे श्री नितीन पोताडे हे माझे मित्र आहेत, हे माझे भाग्यच ! आमच्यात कोणतेही व्यवसायिक संबंध नसून मी केवळ पूर्णपणे स्वयंस्फूर्तीने त्यांनी शोधलेल्या पद्धतीवरील लेखन केले आहे. मी स्वतः डे ट्रेडिंग करीत नसून भविष्यात केल्यास याचा वापर नक्की करेन. ही गोष्ट अधिकाधिक लोकांपैकी पोहोचून यावर विचारमंथन व्हावे आणि अधिक अर्थपूर्ण ट्रेडिंग केले जावे एवढीच इच्छा.
नितीन पोताडे यांच्याशी संपर्क करायचा असेल तर --
फोन नंबर : 9869239959/8389173798
ई मेल : ndpotade@gmail.com
फेसबुक पेजलिंक : https://www.facebook.com/NPsTradingIdeas/
ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !
https://udaypingales.blogspot.in/?m=1
https://www.facebook.com/pingaleuday/.
हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .

No comments:
Post a Comment