चांगले समभाग शोधण्याचे साधन - विविध गुणोत्तरे (Financial Ratios) भाग
ऊ .इफिशियन्सि रेशो : कार्यक्षमतेच्या या रेशोमुळे कंपनी आपली मालमत्ता , भागभांडवल , घेतलेली कर्जे यांचा पूर्ण क्षमतेने वापर करून किमान खर्चात कमाल उत्पादन करते का ?ते समजण्यासाठी मदत होते .
१.वर्किंग कॅपिटल टर्नओवर रेशो :निव्वळ उलाढालिस वर्किंग कॅपिटल म्हणजेच चालू मालमत्तेमधून चालू देयता (liabilities) वजा करून आलेल्या संख्येने भागले तर हा रेशो मिळतो .हा रेशो जेवढा जास्त तेवढे चांगले .
२.रिसिव्हेबल टर्नओवर :या मध्ये निव्वळ उलाढालिस येणे बाकी असलेल्या रकमेने भागले जाते .येणे रक्कम जेवढी कमी तितका भागाकार वाढेल .हा रेशो काळजीपूर्वक काढणे जरुरीचे आहे .
३.इनव्हेटरी टर्नओवर रेशो :उत्पादनातील कच्चा माल , अर्धवट प्रक्रिया झालेला माल आणि उत्पादित परंतु शिल्लक माल यास इनव्हेटरी असे म्हणतात त्यांस विक्री झालेल्या उत्पादित मालास आलेल्या खर्चाने हा रेशो मिळतो .हा रेशो खूपच फसवा असून इनव्हेटरी कमीत कमी असणे त्याचबरोबर उत्पादन खर्च कमी असणे हे चांगल्या कंपनीचे लक्षण आहे .
४.प्राईज अर्निग रेशो :PE या संक्षिप्त नावाने प्रचलित आहे .चालू बाजारभावास प्रतिशेअर कमाई (EPS) भागले असता हे गुणोत्तर मिळते .हा रेशोच्या अनुरूप शेअरचा भाव असता तर त्याविषयी निर्णय घेणे सोपे झाले असते परंतू प्रत्यक्षात अनेक कारणांनी भाव वाढतात आणि हा रेशोही बदलतो .एकदम नामवंत कंपन्या सोडल्यास हा 15/17 असणे चांगले .परंतू हा नियम नाही अनेक नामवंत कंपन्यांचा पी ई सातत्याने 40/45 आहे .
५.कॅश अर्निग पर शेअर :करपश्चात नफ्यास शेअरचे संख्येने भागले की हा रेशो मिळतो .याची तुलना मागील वर्षाशी करता येते .
No comments:
Post a Comment