नियोजनपूर्वक गुंतवणूक योजना (SIP म्हणजेच Sistemetic Investment Plan)
सर्वसाधारणपणे म्यूचुअल फंडाचे संबंधी SIP हा शब्द वारंवार ऐकण्यात येतो .SIP हे कोणत्याही गुंतवणूक योजनेचे नाव नसून म्यूचुअल फंडाच्या नियोजनपूर्वक गुंतवणूक करण्याची एक पद्धत आहे . सर्वाना म्यूचुअल फंड म्हणजे काय आणि त्याचे प्रकार कोणते याविषयी माहीती असेल असे मी येथे गृहित धरले आहे .ज्यांना ही माहीती नसेल त्यांच्यासाठी म्यूचुअल फंडाची माहीती असलेला यापूर्वीचा लेख वाचावा आणि नंतर हा लेख वाचावा म्हणजे एस आई पी विषयी चांगले समजेल कोणतीही गुंतवणूक ही आपली अल्प , मध्यम , दीर्घकालीन उद्दिष्टे पूर्ण व्हावित यासाठी केली जात असून त्यासाठी लागणारी रक्कम आपल्याकडे लवकरात लवकर जमा व्हावी आणि अधिक फायदा व्हावा या हेतूने केली जाते .यातील दीर्घ /प्रदीर्घ कालवधीतील उद्दिष्टे उदा .मुलांचे उच्च शिक्षण ,लग्न , घर घेणे , निवृतीनंतरचे नियोजन पूर्ण करण्याकरीता महागाईचा दर लक्षात घेवुन तजवीज करावी लागते . यासाठी 10/30 वर्षांचा कालावधी असतो तर काही उद्दिष्टे अल्पकालीन असतात कालावधी 6 महीने तर काही मध्यम स्वरूपाची असतात कालावधीत 3 ते 7 वर्ष .एकदा उद्दिष्ट , त्यासाठी लागणारी रक्कम , अपेक्षित परतावा आणि जोखिम घेण्याची क्षमता या गोष्टी ठरल्या की आपल्याकडे असलेली गुंतवणूक योग्य रक्कम , योग्य योजनेची निवड करून त्यात टाकू शकतो . ही ठराविक रक्कम ठराविक मुदतीने ठराविक काळाने गुंतवणे (रिकरिंग डिपोझिट प्रमाणे) यास नियोजनपूर्वक गुंतवणूक योजना (sip) असे म्हणतात . बाजारातील चढ उताराप्रमाणे यूनिटचे निव्वळ मालमत्तामूल्य (nav) कमी अधिक होत असते . एक रकमी केलेली गुंतवणूक जर बाजार नीचांकी पातळीवर असेल तरच फायदेशीर होवू शकते . याचा निश्चित असा अंदाज बांधणे कठीण आहे त्यामुळे अशी संधी शोधण्याऐवजी sip करणे हे अधिक योग्य.या मध्ये nav कमी अथवा जास्त असेल तर मिळणारे यूनिट सरासरी मूल्याने (Rupee cost averaging) मिळत असल्याने धोका कमी संभवतो .जर nav कमी असेल तर जास्त यूनिट येतील तर nav जास्त असेल तर कमी यूनिट येतील .मोठ्या कालखंडात जमा झालेले यूनिटवर चक्रवाढ व्याजाने वाढत जाणारी रक्कम आणि जमा मूद्दल यामुळे मोठ्या प्रमाणात रक्कम जमा होवून जोखिम तीव्रता कमी होवू शकते .अशा प्रकारची गुंतवणूक पेन्शन योजनेतही करता येवू शकते . म्यूचुयल फंडातील समभाग संलग्न बचत योजनेत (Equity link savings scheme ) किमान ₹500/- तर इतर योजनात ₹1000/- दरमहा भरून किमान 6 महीने ते कमाल आपल्या इच्छेनुसार करता येते .म्यूचुअल फंडाच्या पुरस्कर्त्यानी गुंतवणूकदारांच्या सोइसाठी दैनिक , साप्ताहिक , पाक्षिक ,मासिक , त्रैमासिक कालावधीत गुंतवणूक करता येवू शकेल किंवा ठराविक काळाने आपली गुंतवणूक रक्कम वाढवता येवू शकेल अथवा मिळालेल्या डीवीडेंडची रक्कम यूनिट्स मधे परावर्तित करता येईल असे पर्याय देवू केले आहेत .
शेअर असो अथवा म्यूचुअल फंड यूनिट किमान भावात खरेदी आणि कमाल भावात विक्री झाली तरच जास्त फायदा होवू शकतो .यासाठी ठराविक दिवशी ठराविक किंमतीचे शेअर अथवा यूनिट सातत्याने घेतल्यास बाजार वाढला अथवा कमी झाला तरी सरासरी मूल्यांचा फायदा होवू शकतो . सीप पद्धत कोणत्याही प्रकारची फायद्याची हमी देत नसली तेजी आणि मंदी दोन्हीमधे या पद्धतीपासून प्रदीर्घ कालावधीत तोट्यापासून संरक्षण होत असल्याने अंतिमतः गुंतवणूकदाराचा फायदाच होतो .अशाच प्रकारची गुंतवणुक म्यूचुअल फंडातील यूनिट्स शिवाय विशिष्ट समभागात ठराविक दिवशी करून दीर्घकाळात त्याची खरेदी किंमत कमी करता येणे शक्य आहे .ज्यायोगे भविष्यात बाजारमूल्य अधिक असताना त्याची विक्री करून अधिक फायदा मिळवून आपले ध्येय मुदतीपुर्वी करता येवू शकेल .
©उदय पिंगळे

No comments:
Post a Comment