भांडवल बाजार विषयक सात मूलभूत प्राथमिक संज्ञा....
आर्थिक विषयांशी, प्रामुख्याने भांडवल बाजाराशी संबंधित विक्रेते (agents ), दलाल (brokers), गुंतवणुक विश्लेषक (investment anyalists),वित्त व्यवस्थापक (welth managers),गुंतवणुक तज्ञ (investment experts) याच्या बोलण्यातून धोका (risk), तेजी (bull),मंदी (bear)उतारा (return), त्यांचा एकमेकांशी असलेला संबध (risk return retio), गुंतवणुक विविधता (diversification),गुंतवणूक संच (portfolio):असे शब्द सातत्याने वापरले जातात.आपण या संज्ञांचे नेमके अर्थ समजून धेवूया.
१)धोका (risk): ही एक नकारात्मक बाजू आहे. गुंतवणूक ही दीर्घ कालीन प्रक्रिया असल्याने यातून त्यामध्ये असलेल्या जोखमीमुळे आपण आपले जास्तीत जास्त किती संभाव्य नुकसान होवू शकेल यांसंबंधीचा विचार यात करतो. त्यानंतरच यासंबंधीचा निर्णय घेतो. कुठेही पैसे गुंतवले तरी त्यात काहीतरी धोका असतोच.आपण बँकेत पैसे ठेवले आहेत त्या बँकेचे दिवाळे वाजू शकते. स्थावर मालमत्तेची किंमत घटू शकते.सुरू केलेल्या उद्योगासाठी वापरलेले भांडवल कमी होवू शकते. सर्वसाधारण पणे सरकारी पाठबळ असलेल्या योजना किंवा मोठ्या उद्योगसमूहात गुंतवणुक करण्यात धोका कमी असतो.आपण केलेल्या गुंतवणूकीवर पैशाच्या रूपात किती नफा अगर नुकसान झाले यावरून धोका किंवा फायद्याची मोजणी करता येते.
२)तेजी (bull market):हा एक असा कालखंड आहे की या काळात समभागांच्या किमती सातत्याने वर जात असतात थोड्याफार विरोधी कारणांनी बाजारावर खास परिणाम होत नाही.मालाला उठाव असतो ,बेकारीचे प्रमाण कमी असते.अर्थव्यवस्था सुधृढ असल्याचे हे लक्षण आहे. या काळात सातत्याने फायदा होत असल्याने कोठेही गुंतवणूक केली असताना फायदाच होण्याची शक्यता जास्त असते.
३)मंदी (bear market): या काळात बरोबर उलट स्थिती असते समभागांच्या किंमती सातत्याने कमी कमी होत असतात.काही गुंतवणूकदार समभागांची प्रथम विक्री (short selling)करून नंतर खरेदी करून देऊन नफा मिळवतात.कंपनीच्या आकर्षित कामगिरीमुळे भावामद्धे खास वाढ होत नाही.असे असले तरी प्रत्येक मंदी ही येणाऱ्या तेजीची सुरुवात असते आणि काळाचे भान असणाऱ्या गुंतवणुकदारांच्या दृष्टीने ही एक संधी असते.
४)उतारा (return):ही एक नफा /नुकसान यासंबंधीची सकारात्मक/नकारात्मक बाब असून यामध्ये आपण कलेल्या गुंतवणुकीवर मिळालेले व्याज ,लाभांश , भांडवली नफा/तोटा यांचा समावेश होतो.त्याची मोजणी ही गूंतवलेल्या रकमेच्या तुलनेत केली जाते.
५)धोका आणि उतारा संबध (risk reward ratio) :यांचा एकमेकांशी सरळसरळ संबध असून जेवढा धोका जास्त स्वीकारला जाईल त्या प्रमाणात नफा किंवा नुकसान जास्त होण्याची शक्यता असते.जेव्हा जेव्हा कमी धोका आणि जास्त उतारा मिळण्याची शक्यता असते तेव्हा प्रत्येक वेळी गुंतवणूकीची संधी निर्माण होते. अशा प्रत्येक वेळी मागणीत वाढ होते ,तुलनेने पुरवठा कमी होतो साहजिकच भावात वाढ होते आणि उतारा कमी होण्याची शक्यता वाढते. तेव्हा कष्टाशिवाय फायदा नाही हे तत्व विसरू नये.त्यामुळे सर्व बाजूंचा अभ्यास करूनच गुंतवणुकीचे निर्णय घ्यायला हवेत.
६)गुंतवणूक विविधता (diversification) : आपली गुंतवणुक एकाच प्रकारात न करता त्यात विविधता हवी. विविध क्षेत्रांतील उद्योगांचे समभाग , रोखे अल्प व दीर्घ मुदतीची सरकारी कर्जे ,म्यूचुअल फंडांचे यूनिट , एक्सचेंज ट्रेडेड फंड ,विविध वस्तु बाजार , वायदे, ऑप्शन ,फ्यूचर यांमध्ये कमीजास्त प्रमाणात करून गुंतवणूकीचा समतोल साधता आल्यास यांतील धोक्याचे प्रमाण खूप कमी करता येऊ शकते.
७)गुंतवणूक संच (portfolio): वर उल्लेख केलेले भांडवल बाजाराशी संबधित विविध प्रकारांचा एकत्रित संच म्हणजेच आपला स्वतःचा गुंतवणूक संच होय.
©उदय पिंगळे
ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !
https://udaypingales.blogspot.in/?m=1
https://www.facebook.com/pingaleuday/

No comments:
Post a Comment