अनिश्चित उत्पन्न आणि गुंतवणूक नियोजन
आपल्यापैकी अनेकजण जे व्यवसाय किंवा उद्योगधंदा करत आहेत. त्यामुळे त्यांचे मासिक उत्पन्न हे पगारदारांप्रमाणे निश्चित असे नाही. त्यांना वेतनवाढ नाही की महागाई भत्ता नाही. कधी उत्पन्न जेमतेम मिळते तर कधी अनपेक्षितपणे मोठा लाभ होतो तर काही महिने खूप कमी उत्पन्न मिळते. याची अनेक कारणे आहेत त्यातील काही व्यवसाय हे विशिष्ट काळापूरतेच असतात तर काही व्यवसायात सातत्याने तेजी मंदीचे चक्र चालू असते तर काही वेळा त्यात एवढी अनिश्चितता असते की यातून वार्षिक खर्चाची भरपाई होत असली तरी ज्या किमान रकमेची गुंतवणूक होयला हवी ती त्यांच्याकडून होऊ शकत नाही किंवा असे काहीतरी करता येऊ शकेल का? या दृष्टिकोनातून ते विचारच करीत नाहीत. याची अनेक कारणे असली भविष्यकाळाचा विचार करून काही रक्कम वेगळी व बाजूला ठेवणे जरुरीचे असते. त्याचप्रमाणे खर्च कमीतकमी करावा हे कितीही खरे असेल तरी प्रत्येकाला किमान काही खर्च करावा लागतो तर काही अनावश्यक खर्च आपण टाळू शकत नाही. त्यासाठी एकंदर गुंतवणूक नियोजन अधिक काटेकोरपणे करावे लागते. ते कसे करता येईल याचा विचार करूयात. यासाठी एक वर्षभराच्या उत्पन्न व खर्च यांचा विचार करावा लागेल.
1. कमीतकमी किती खर्च करावा लागेल याचा अंदाज मांडणे: सर्वप्रथम मासिक खर्च लिहून काढावा यातून कोणकोणते खर्च करावे लागतात जसे की लाईट बिल, मोबाईल रिचार्ज, शाळेची / क्लासची फी, किराणा माल, भाजीपाला, दूध, करमणूक, प्रवास, औषधोपचार, कपडे, भेटवस्तू घरभाडे ई. ते समजते त्याचे वर्गीकरण करावे. यातील कोणते खर्च टाळता येण्यासारखे आहेत तर कोणते टाळता न येण्यासारखे आहेत यांची विभागणी करून त्यांची बेरीज करावी यामधून आपल्याला दरमहा घरखर्चास किमान आवश्यक रक्कम किती आहे ते समजेल. यातील काही आवश्यक खर्च कमी करण्याचे काही पर्याय आहेत का? यांचा शोध घ्यावा. जसे किराणामाल, भाजीपाला, फळे, घाऊक बाजारातून आणणे, नियमित औषधे किमान विक्री किंमतीहून कमी किमतीत विक्री करणारी दुकाने शोधणे सध्या अशी औषधे 20% कमी दराने देणारी दुकाने आहेत अथवा जेनेरिक औषधांचा पर्याय निवडल्यास या खर्चात 50% ते 70% एवढी मोठी बचत होऊ शकते. थोडक्यात आपल्यावर जीवनशैलीत फारसा न पडता पैसे वाचवण्यासाठी असलेले अन्य मार्ग शोधावेत. यानंतर येणाऱ्या एकूण वार्षिक खर्चावरून मासिक खर्च काढावा.
2. काही अनावश्यक खर्च कमी कसे करता येतील ते पाहावे : चित्रपट पाहणे, हॉटेलिंग करणे अनेकदा केले जाते जरी याची आवश्यकता असली तरी अनेक साध्या गोष्टी साजऱ्या करण्याची ती एक पद्धतच बनून कधी बनून जाते ते समजतच नाही असे होणे हे अनावश्यक असते. तेव्हा याची वारंवारता कमी कशी करता येईल ते पहावे. अश्या तिमाही खर्चावरून यावर होणारा मासिक खर्च काढावा.
3.सरासरी मासिक उत्पन्न व खर्च निश्चित करणे: याप्रमाणे दर महिन्याला होणारा आवश्यक अनावश्यक खर्च मिळेल यातून एकूण सरासरी खर्च काढता येईल. याचप्रमाणे वर्षभरात दरमहा मिळालेले उत्पन्न एकत्र करून त्यावरून सरासरी मासिक उत्पन्न व सरासरी मासिक खर्च काढता येईल. ही रक्कम एकदा तुम्हाला समजली की भविष्यात मासिक खर्चाचे नियोजन करताना त्याचा उपयोग होईल. आपले उत्पन्न हे मागील वर्षातील सर्वात कमी उत्पन्नाच्या एवढे आहे असे गृहीत धरून त्यावरून पुढील खर्चाचे नियोजन केल्यास आणि असे करीत असताना पैसे कमी पडत असतील तर अनावश्यक खर्च अंशतः किंवा पूर्णपणे रद्द करता येतील. यामुळे आपल्याकडे कधी थोडे पैसे शिल्लक राहिले आहेत तर एखाद्या महिन्यात बरेच पैसे शिल्लख राहिल्याचा आपल्याला अनुभव येईल. याप्रमाणे खर्च आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न केल्यास जास्तीची शिल्लक रक्कम बाजूला ठेवून आपणास अनपेक्षित असलेले खर्च भविष्यात उद्भवल्यास त्यास तोंड देता येईल.
4.खर्चाचे नियोजन : याप्रमाणे मागील 12 महिन्यातील किमान उत्पन्न हे पुढील महिन्याचे उत्पन्न म्हणून गृहीत धरून आवश्यक, अनावश्यक खर्चाचे नियोजन केल्यास आपल्या किमान गरजा पूर्ण होतील. यात काही कारणाने अडचण आल्यास यातील अनावश्यक खर्च टाळता येईल.
5. राखीव निधीची निर्मिती: प्रत्येक व्यक्तीने किमान सहा ते बारा महिने पुरेल एवढा राखीव निधी आपल्याकडे ठेवणे जरुरीचे आहे. वरील प्रकारे शिल्लक पैसे राखीव निधीकडे वळवल्यास केवळ अशा निधी असण्याच्या समाधानाने व्यक्तीला सकारात्मक ऊर्जा मिळेल. हा राखीव निधीच अडीअडचणीच्या काळात तुम्हाला अधिक कर्जबाजारी होण्यापासून वाचावेत. फक्त तो खऱ्याखुऱ्या कारणासच वापरला गेला पाहिजे. लक्षात ठेवा, तुमच्या जास्त उत्पन्न मिळण्याच्या कालावधीत, होणाऱ्या अनावश्यक खर्चाच्या वाढीमुळे अशा प्रकारे राखीव निधी निर्माण करण्यापासून तुम्ही दूर जात असता.
पैशाच्या असमान वितरणामुळे त्याचे व्यक्तिच्या गरजेप्रमाणे नियोजन करणे हे मोठे आव्हानात्मक काम आहे. पैशाचा फारसा विचार करू नये हे तत्वज्ञान म्हणून सांगायला सोपे असले तरी पैसा हे साध्य नसून अनेक गोष्टींचे साधन आहे हे मान्य करावे लागेल. त्यामुळेच त्याच्या योग्य नियोजनाच्या अभावामुळे मासिक लाखभर रुपये मिळवणारी व्यक्ती फारशी गुंतवणूक करू शकत नाही तर नियोजन करणारी मासिक 15 हजार रुपये मिळवणारी व्यक्ती आपल्या उत्पन्नात वाढ कशी करता येईल याचा मार्ग शोधू शकते. यासाठी कोणत्याही अर्थातज्ञाची गरज नसून त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे.
©उदय पिंगळे
अर्थसाक्षर येथे 10 जानेवारी 2020 रोजी पूर्वप्रकाशीत.

No comments:
Post a Comment