क्रेडिट कार्ड कॅशबॅक एक भुलभुलैया
नवीन वर्षांचे स्वागत, विविध सणवार, स्वातंत्र्य दिन, व्हॅलेन्टाईन डे, या वर्षातील मेगा ऑफर, सुपर बंपर ऑफर अशी विविध कारणे देऊन क्रेडिट कार्ड देत असलेली कंपनी (बँक/ वित्तीय संस्था) आपल्या ग्राहकांना कॅशबॅकची ऑफर देत असतात. ही रक्कम आपल्या खरेदीच्या बिलातून थेट कमी होते अथवा पूर्ण बिल केल्यानंतर खात्यात वेगळी परत येते. बोनस पॉईंट व्यतिरिक्त अशी संधी मिळत असल्याने, अशा आशयाची सूचना आली की ग्राहक मनातून सुखावतो आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा घेऊयात असा संकल्प सोडतो. कोणतीही गोष्ट मोफत मिळते आहे याचे सर्वाना आकर्षण असल्याने त्याला आनंद होतो. लोकांच्या याच मनोवृत्तीचा लाभ उठवण्यात येतो. वास्तविक कोणतीही गोष्ट आपल्याला कधीच फुकट मिळत नसते.
क्रेडिट कार्ड देणाऱ्या कंपन्यांचा कार्ड देणे हा व्यवसाय असल्याने अधिकाधिक ग्राहकांनी सतत खरेदी करून त्यांचा व्यवसाय वाढवावा अशी त्यांची इच्छा असते आणि ते सहाजिकच आहे. कार्ड देणाऱ्या कंपन्या ग्राहकांना प्रोत्साहित करण्यासाठी अशा योजना का देत असाव्यात आणि 5% ते 10% कॅशबॅक हे त्यांना कसं परवडत असेल? याचा आपण कधी विचार केला आहेत का? जेथे कार्ड वापरले जाते त्या व्यावसायिकांकडून फी रूपाने काही रक्कम मिळत असते. अशा प्रकारच्या योजना आणल्याने अधिकाधिक ग्राहक त्यांच्याकडे आकर्षित होतात त्यामुळे खरेदी वाढते अशी खरेदी वाढली की कार्ड कंपनीचे उत्पन्न वाढते. यातील फायद्याचा काही भाग ते ग्राहकांना परत करतात हे त्यांना कोणतीही आर्थिक झळ न बसता परवडू शकतं कारण-
★या योजनेमुळे वस्तूंची विक्री पर्यायाने व्यवसाय वृद्धी होत असते.
★ज्याप्रमाणे योजना आहे म्हणून तिचा फायदा घेऊन खर्च वाढवणारे ग्राहक आहेत त्याचप्रमाणे या योजनेचा विचार न करता नियमितपणे फक्त कार्ड वापरूनच खरेदी करणारे ग्राहकही आहेत. त्यांनी केलेल्या मर्यादित खरेदीवर बहुदा या कंपन्यांना फारसे काही द्यावे लागत नाही. त्यामुळे कंपनीचे नियमित व्यवसाय देणारे हे ग्राहक असतात.
★ही योजना मर्यादित काळापुरती असते तसेच कॅशबॅक टक्केवारी आणि किती रकमेचे होईल त्यावर मर्यादा असते.
★आपल्या परतफेड मर्यादेहून खरेदी झाल्यास किंवा अन्य काही अडचणींमुळे यातील काही ग्राहक आपली देय रक्कम समान मासिक हप्त्याने फेडण्याचा पर्याय निवडतात यावरील व्याजदर हा नेहमीच सर्वसाधारण व्याजदाराहून अधिक असतो. त्यामुळे अशा काही ग्राहकांकडून कंपनीस जास्त उत्पन्न मिळते. याशिवाय काही कंपन्या अशा रीतीने केलेल्या खरेदीसाठी ही सवलत देत नाहीत.
★वाढीव खरेदी मुळे यातील काहीजण देय तारखेस रक्कम देऊ शकत नाहीत त्यावर व्याज आणि दंड आकाराला जातो. व्याजदर तर अधिक असतोच पण दंड म्हणून आकारण्यात येणारी किमान रक्कम ही खूप अधिक असते.
तेव्हा केवळ योजना आहे म्हणून खरेदी, या दृष्टीने याकडे न पाहता त्याचा तपशील, जो अतिशय बारीक अक्षरात लिहिलेला असतो तो व्यवस्थित वाचावा यामध्ये -
★कोणत्या कालावधीत केलेली खरेदी मान्य होईल, ते नीट पाहून घ्या.
★ही योजना खरीखुरी कॅशबॅक आहे का? याची खात्री करावी अनेकदा अन्य ठिकाणी ही वस्तु आपल्याला पडणाऱ्या किंमतीहून कमी किमतीत उपलब्ध असते. असे असल्यास त्या वस्तूवरील कॅशबॅकला काही अर्थच नसतो.
★किमान किती रकमेची खरेदी केली पाहिजे ते पाहावे. याहून कमी रक्कम कॅशबॅकला पात्र असणार नाही.
★कॅशबॅकची टक्केवारी व कमाल मर्यादा याहून अधिक खरेदी केल्यास कॅशबॅक मर्यादित असते.
★कोणते व्यवहार कॅशबॅकसाठी पात्र व कोणते अपात्र ते पाहावे. अनेक कंपन्या यातून काही व्यवहार जसे किराणा माल, भाजीपाला वगळतात ते कोणते ते पाहावे.
ज्या व्यक्ती क्रेडिट कार्डने नियमितपणे व्यवहार करून बिलाची रक्कम देय तारखेपर्यत भरतात त्याचे व्यवहार दिलेल्या कालावधीत योजनेत असलेल्या अटींनुसार होत असतील केवळ अशाच लोकांना याचा खराखुरा फायदा होईल. त्यांनाही कॅशबॅकचा मोह पडावा व त्यांनी अधिक खरेदी करावी आणि वारंवार अशा योजनेत भाग घ्यावा म्हणून सर्वानाच सातत्याने फोन करून नवीन योजनेची माहिती देणे, खरेदी रक्कम हप्त्याने द्यावी, वैयक्तिक कर्ज घ्यावे म्हणून सातत्याने पाठपुरावा करत असतात. लोकांसाठी त्यांना कर्जबाजारी करण्याचा हा सापळा असून कॅशबॅक हे आमिष आहे. जर एखादी व्यक्ती बिल रक्कम देय कालावधीत न देऊ शकल्यास जबर व्याज, दंड आकारणी केली जातेच पण यामुळे त्यांच्या क्रेडिट स्कॉअरवर विपरीत परिणाम होऊन त्यांना जेव्हा खरोखरच कर्जाची गरज असते तेव्हा मिळणे कठीण होऊन जाते. तेव्हा या सापळ्यात न अडकणे हेच शहाणपणाचे आहे.
©उदय पिंगळे
अर्थसाक्षर येथे 3 जानेवारी 2020 रोजी पूर्वप्रकाशीत.

No comments:
Post a Comment