#सर्वसाधारण_विमायोजना_विविध_प्रकार
विविध प्रकारच्या धोक्यातून होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण मिळवण्यासाठी विमा काढला जातो, हे आपल्याला माहीत आहेच. विम्याद्वारे ही भरपाई पैशांच्या स्वरूपात केली जाते. आयुष्याची अशाश्वतता ही जीवनविमा (Life insurance) घेऊन सुरक्षित केली जाते तर इतर सर्व गोष्टीतील धोका हा सर्वसाधारण विमा योजना (General Insurance) घेऊन सुरक्षित केला जातो. अशा अनेक प्रकारचे घोके निश्चित करून त्यावर मात करण्यासाठी सर्वसाधारण विमा घेतला जातो. हा ग्राहक आणि विमाकंपनी यातील कायदेशीर करार असून उभयपक्षी यातील अटींचे पालन करावे लागते. या योजनांची मुदत सर्वसाधारण पणे एक वर्ष असून क्वचित 2/3 वर्षाचीही असू शकते. यातील काही योजना या कायद्याने आवश्यक असून अनेक योजना ऐच्छिक आहेत. यात भरलेला हप्ता जर सदर कालावधीत उल्लेख केलेली दुर्घटना न घडल्यास परत मिळत नाही. धोका भरापाईसाठी ग्राहकाने मोजलेली ती किंमत असते. स्वातंत्र्य मिळाल्यावर 26 वर्षांहून अधिक काळ सर्वसाधारण विमा कंपन्या खासगी होत्या 1973 मध्ये त्यांचे राष्ट्रीयकरण करण्यात येऊन चार स्वतंत्र सरकारी कंपन्या निर्माण करण्यात आल्या. तर नंतर विमा व्यवसाय पुन्हा खुला करण्यात आल्यावर 1999 साली म्हणजे आणखी 26 वर्षांनी खाजगी व्यावसायिकांना सर्वसाधारण विमा व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात आली. सध्या चार सरकारी आणि 30 खाजगी कंपन्या भारतात हा व्यवसाय करीत असून त्या देत असलेल्या सर्वसाधारण विम्याचे प्रमुख प्रकारांची आपण माहिती घेऊयात.
१. आरोग्यविमा (Helth Insurance): आरोग्यावरील खर्चात सातत्याने वाढ होत असून एखादा गंभीर आजार आपले वर्षानुवर्षे जमलेली सर्व पुंजी नाहीशी करू शकतो. यापासून यातून बऱ्याच प्रमाणात भरपाई होऊ शकते. सदर योजना वैयक्तिकरित्या अथवा कुटूंबासाठी एकत्रीत घेता येते. साधारणपणे किमान एक दिवस इस्पितळात राहून उपचार घेतले असतील तर कराराप्रमाणे त्याची भरपाई होते. सर्वसाधारणपणे प्रत्येक आजारास खर्चाची मर्यादा असते. यात आधीच असलेल्या आजारामुळे येणाऱ्या आजारावरील झालेल्या खर्चाची पूर्तता होत नाही त्यासाठी काही काळ जावा लागतो. अनेक कंपन्या त्यांचे कर्मचारी व कुटूंबीय यांना अश्या प्रकारची पॉलिसी देतात त्यातील अटी भिन्न असू शकतात. मान्यताप्राप्त हॉस्पिटलमध्ये कॅशलेस सुविधा उपलब्ध असून इतरत्र प्रथम खर्च करून नंतर प्रतिपूर्ती करण्यात येते. आपल्या वार्षिक उत्पन्नच्या दोन ते तीन पट रकमेचा आरोग्यविमा घेणे जरुरी आहे.
२.अपघात विमा (Accident Insurance): अशा योजनेत अपघात झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास यामुळे होणारे नुकसान भरून मिळते. काही योजनांत कोणत्याही अटीशिवाय ठराविक भरपाई दिली जाते.
३. प्रवास विमा (Trave Insurance) : पूर्वनियोजित प्रवास करण्यास काही विलंब झाल्यास, पासपोर्ट, सामान हरवल्यास, अचानक आजारी पडल्यास होणाऱ्या नुकसानीची भरपाई करारात नमूद अटीनुसार केली जाते. विशेषतः परदेश प्रवासात अशा विम्याची जरूर असते.
४. मोटार विमा (Motor Insurance): वाहनांमुळे अपघात होऊन इतर व्यक्तींचे, मालमत्तेचे नुकसान होऊ शकते म्हणून थर्ड पार्टी इन्शुरन्स घेणे कायद्यानुसार सक्तीचे आहे. याशिवाय वाहन आणि त्याचे विविध भाग यांचे अपघाताने होणारे नुकसान भरून मिळावे म्हणूनही पॉलिसी घेतली जाते. गाडीची किंमत आणि वय याचा विचार करून दरवर्षी ती रक्कम कमी कमी होत राहाते.
५.मालमत्तेचा विमा (Property Insurance) आग, चोरी, नैसर्गिक आपत्ती यामुळे होणारे मालमत्तेचे नुकसान भरून काढण्यासाठी अशी पॉलिसी घेतली जाते. घर, कारखान्याची इमारत, सोने चांदी हिरे यांच्या वस्तू, गृहपयोगी वस्तू, मशिनरी , कच्चा पक्का माल अशा चल अचल वस्तूंचा विमा घेतला जातो. या करारात नमूद स्थिती उद्भवली तरच मान्य केलेली भरपाई विमा कंपनीकडून होऊ शकते.
६.निष्ठेचा विमा: (Fedelity Insurance) : या प्रकारचा विमा मालकाकडून घेतला जातो. बंद, संप किंवा कर्मचाऱ्यांच्या चुकीच्या निर्णयाने झालेल्या नुकसानीची यातून भरपाई होते.
७.संचालक आणि अधिकारी यांचा विमा (Director and officers insurance) कंपनीच्या वतीने काम करीत असता होऊ शकणाऱ्या संभाव्य नुकसानीची यातून भरपाई होऊ शकते.
८.महत्वाच्या व्यक्तीचा विमा (Key man insurance): कंपनीच्या दृष्टीने धोरणात्मक निर्णय घेणाऱ्या चुकीमुळे होऊ शकणाऱ्या नुकसानाची यातून भरपाई होऊ शकते.
९.पीक विमा (Agriculture Insurance): येथील शेती ही प्रामुख्याने पावसावर अवलंबून असून पाऊस कसा आणि किती पडेल याची खात्री नाही. सदोष बियाणे, अतिवृष्टी, अवर्षण यामुळे शेतीचे नुकसान झाल्यास या पॉलिसीतून त्याची भरपाई होते.
या मुख्य योजनांशीवाय ग्राहकाच्या गरजेनुसार विमा कंपन्या सर्वसाधारण विमा देत आहेत. आपली गरज ओळखून त्याप्रमाणे त्याच्याकडून योजना घेता येईल. या योजना विक्री प्रतिनिधीकडून किंवा ऑनलाईन घेता येतात. ऑनलाइन योजनांचा प्रीमियम कमी असतो. यातील कारारात भरपाईचे विस्तृत विवरण असून जर तशीच घटना घडली तरच भरपाई मागता येते. तेव्हा करार करताना यातील अटींची माहिती व्यवस्थितपणे करून घेणे जरुरीचे आहे.
©उदय पिंगळे
मनाचेTalks येथे 16 नोव्हेंबर 2018 रोजी पूर्वप्रकाशीत.
ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !
https://udaypingales.blogspot.in/?m=1
https://www.facebook.com/pingaleuday/.
हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .

No comments:
Post a Comment