#ऑप्शन्स_संबंधीत_व्यवहारातील_शब्दावली
ऑप्शन्स हा मालमत्तेचा भावी करार असून तो खरेदीदारास कराराच्या कालावधीत नमूद केलेली मालमत्ता खरेदी / विक्री करण्याचा हक्क देत असून विक्रेत्यावर हा करार पूर्ण करण्याचे बंधन टाकतो .हे व्यवहार कसे होतात ते आपण यापूर्वीच्या लेखात समजून घेतले .या व्यवहारासंबंधी काही परिचित , अपरिचित शब्दसमूहांची माहिती करुन घेवूयात .
1.ऑप्शन रायटर : ऑप्शन्सची विक्री करणाऱ्या विक्रेत्यास ऑप्शन्स रायटर असे म्हणतात .
2.कॉल ऑप्शन्स : या कराराच्या खरेदीदारास त्यात नमूद केलेल्या मालमत्तेच्या खरेदीचा अधिकार मिळतो .
3.पुट ऑप्शन्स :या कराराच्या खरेदीदारास त्यात नमूद केलेल्या मालमत्तेच्या विक्रीचा अधिकार मिळतो .
4.ऑप्शन्सची किंमत /प्रिमियम : ऑप्शन्स खरेदी करणाऱ्याकडून विक्रेत्यास जी रक्कम दिली जाते त्यास ऑप्शन प्राईज किंवा प्रिमियम असे म्हणतात .
5.एक्सपायरेशन डेट : करारात नमूद केलेली ऑप्शन्स बंद होण्याच्या तारखेस ऑप्शन्स एक्सपायरेशन डेट असे म्हनतात .
6.स्ट्राईक प्राईज : जी किंमत आधार धरून ऑप्शन्सचा करार केला जातो त्यास स्ट्राईक प्राईज किंवा एक्जसाईज प्राईज असे म्हणतात .
7.इज इन द मनी /ऍट द मनी /आऊट ऑफ द मनी : स्ट्राईक प्राईजहून मालमत्तेची बाजारातील किंमत जास्त असल्यास त्या कॉल ऑप्शन्सला इन द मनी कॉल ऑप्शन्स असे म्हणतात .जर या दोन्ही किंमतीत समपातळीत असतील तर त्या कॉल ऑप्शन्सला ऍट द मनी कॉल ऑप्शन्स आणि बाजारातील किंमत स्ट्राईक प्राईजपेक्षा कमी असेल तर त्या कॉल ऑप्शन्सला आउट ऑफ द मनी कॉल ऑप्शन्स असे म्हणतात याउलट स्ट्राईक प्राईजहून मालमत्तेची बाजारतील किंमत अधीक असेल तर पुट ऑन आउट ऑफ़ द मनी पुटऑप्शन्स असे म्हटले जाते .
8.ऑप्शन्सचे आंतरिक मूल्य (Intrinsic value): जेव्हा कॉल ऑप्शन्स इन द मनी असतो तेव्हा त्याच्या बाजारभाव व स्ट्राईक प्राईज यातील फरकाला त्याची इन्ट्रिस्टिक व्हेल्यु असे म्हनतात .
9.ऑप्शन्स टाईम व्हेल्यू :ऑप्शन्स प्रिमियम आणि त्याची इन्ट्रिस्टिक व्हेल्यु मधील फरकाला ऑप्शन्सची टाईम व्हेल्यु असे म्हणतात .
10.कव्हर्ड आणि अनकव्हर्ड ऑप्शन्स : जेव्हा ऑप्शन्सचा विक्रेता हा मालमत्तेचा मालक असतो तेंव्हा तो कव्हर्ड आहे जर ही मालमत्ता उधार घेवून विकत असेल तर तो अनकव्हर्ड ऑप्शन्स आहे असे म्हटले जाते .
फ्युचर्स आणि ऑप्शन्स हे थोडे गुंतागुंतीचे , एक्सचेंजच्या माध्यमातून केले जाणारे , वायद्यांचे करार असून यातील संकल्पना आपल्या फार परिचयाच्या नसल्याने त्या किंचित अवघड वाटतात . हे करार करण्यास म्यूचुयल फंड , विदेशी वित्त संस्था (FII) आणि स्वदेशी वित्त संस्था (DII)यांना बंदी आहे .फक्त नुकसान कमी करण्यासाठी त्यांना त्यांच्याकडे असलेल्या मालमत्तेचे प्रमाणात हेजिंग करण्यासाठी ( तोटा कमी करण्यासाठी) यांचा वापर करता येतो .सट्यासाठी (Speculation) यांचा वापर त्यांना करता येत नाही .या संस्था , इतर मोठें गुंतवणूकदार ,गुंतवणूक संधी शोधणारे (Arbitrager) आणि सट्टेबाज यांचा कसा वापर करतात ते पुढील भागांत पाहूया .

©उदय पिंगळे
ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !
हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .
No comments:
Post a Comment