__भागबाजार (Stock Exchange)__
भागबाजार (stock exchange)हा भांडवलबाजाराचा महत्वाचा घटक असून तेथे समभाग (Shares) ,कर्जरोखे (Debentures) ,सरकारी /खासगी रोखे (Bonds) ,परस्पर निधी (Mutual fund units) , समभाग निधी (ETF) ,विविध देशांची विनिमय चलने (Forex) , वस्तू बाजारातील वस्तू (Commodity) जसे सोने ,चांदी ,खनिज तेल ई .यांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार केले जातात .भागबाजारतून कृषी /सेवा क्षेत्र /उद्योग /सरकार यांना मध्यम आणि दीर्घ मुदतिचे भांडवल उपलब्ध होते .अशाप्रकारे भांडवल उभारणी ही विविध नियमांचे पालन करून केवळ नोंदणीकृत कंपन्यांना करता येते .याचप्रमाणे या बाजारात उपलब्ध बहुविध गुंतवणूक पर्यायामुळे व्यक्ति , बँका ,विमा कंपन्या ,निवृती वेतन योजना राबवणाऱ्या कंपन्या , परकीय गुंतवणूकदार यांना अतिरिक्त रक्कम जोखिम पत्करून किफायतशीरपणे गुंतवण्याची संधी प्राप्त झाली आहे . यापैकी वस्तू बाजारातील वस्तूचे व्यवहार प्रामुख्याने मल्टि कमोडीटी एक्सचेंजवर तर इतर सर्व व्यवहार प्रामुख्याने राष्ट्रीय शेअर बाजार आणि मुंबई शेअर बाजारात होतात आणि ते कुठूनही करता येतात .या सर्व व्यवहारावर सेबी या स्वतंत्र नियामकाचे नियंत्रण आहे आणि हे व्यवहार विनातक्रार पार पाडण्यासाठी नियम करणे ,त्यात बदल करणे , त्याची अमल बजावणी करणे , लक्ष ठेवणे , नियमबाह्य वर्तन करणाऱ्याना शिक्षा करणे ,तक्रार निवारणाची यंत्रणा उभी करणे , गुंतवणूक दाराना प्रोत्साहित व शिक्षित करणे सेबीला करावे लागते .सरकारला मोठ्या प्रमाणात करप्राप्ती आणि गुंतवणूकदाराना भागबाजाराच्या माध्यमातून रोकडसुलभता आणि लाभप्रदता यांचे विविध पर्याय प्राप्त होत आहेत .सरकारला तसेच खाजगीक्षेत्रातील उद्योग आणि सेवाक्षेत्र यांना कमी खर्चात मोठ्या प्रमाणात भांडवलाची उभारणी करता येत असून यासाठी नियम करण्यात आले आहेत .बाजारात व्यवहार करण्यासाठी त्यांचे पालन करावे लागते .केवळ नोंदणीकृत कंपन्यांना येथे व्यवहार करता येतात .अधिकृत दलालांमार्फत हे व्यवहार करावे लागतात . बाजारांच्या कार्यपद्धतीत अलीकडील काळात महत्वपूर्ण सुधारणा झाल्या असून सर्व व्यवहार संगणकामार्फत (Computer) आणि निक्षेपस्थानातून (Depositry) होत असल्याने आणि त्यांची प्रतिपूर्ति राष्ट्रीय समाशोधान यंत्रणेच्या (National Clearing Corporation) च्या माध्यमातून होत असल्याने व्यवहार पूर्ण होण्याचा कालावधी खूप कमी झाला आहे .गुंतवणूकदाराना त्यांच्या गुंतवणूक करण्याच्या आणि जोखिम घेण्याच्या क्षमतेनूसार रोख (cash)त्याच दिवशी व्यवहार (intraday)किंवा सौदापुर्तीचे दिवशी व्यवहार (delivery ) ,आधी खरेदी नंतर विक्री (sell) ,आधी विक्री नंतर खरेदी (short sell ),हजर व्यवहार (spot),वायदे व्यवहार (forward ) , अदलाबदल व्यवहार (swap),भावी व्यवहार (futures),पर्याय व्यवहार (options) , इनव्हीट (investment trust ) यासारखे अनेक ,पर्याय उपलब्ध आहेत .
©उदय पिंगळे
ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !
https://udaypingales.blogspot.in/?m=1
https://www.facebook.com/pingaleuday/.
आपल्या मित्रांनी ही माहिती वाचण्यासाठी शेअर करा म्हणजे अनेकांपर्यत ही माहिती एकाच वेळी पोहोचेल.

No comments:
Post a Comment