पेमेंट बँक (Payment Banks )
पेमेंट बँक या मर्यादित बँकिंग व्यवहार करणाऱ्या छोट्या बँका असून त्या कोणतीही जोखिम स्वीकारत नाहीत .या बँका बहुतेक सर्व प्रकारचे बँकिंग व्यवहार करतात त्यांच्याकडे बचत /चालू खाते काढता येते .परंतू या बँका कर्ज देत नाहीत ,मुदत ठेवी स्वीकारत नाहीत .ग्राहकांना क्रेडिट कार्ड देऊ शकत नाहीत .1लाख रुपयांहून अधिक रकमेच्या मागणी ठेवी (Demand Diposite) स्वीकारू शकत नाहीत .बिलांची वसूली , देण्यांची पूर्तता , मोबाईलवरुन पैशाचे व्यवहार , खरेदी विक्री , विविध सरकारी योजनांची प्रोत्साहन राशी ,आरोग्य शिक्षण गँस यावरील सरकारी सबसीडी थेट जमा करणे ,ए टी एम चे व्यवहार ,नेटबँकिंग ,थर्ड पार्टी फंड ट्रान्स्फर परकीय चलन व्यवहार या सारख्या सुविधा देतात .
सप्टेंबर 2013 मधे डॉ नचीकेत मोर यांच्या अध्यक्षते खालील कमिटीने छोटे उद्योग आणि अल्प उत्पन्नधारक व्यक्तींच्या आर्थिक गरजा आणि अपेक्षा आढावा घेतला होतो .बँकिंग व्यवस्थेपासून देशातील 25 कोटी लोक वंचित असून ते आपले सर्व व्यवहार रोखीने करतात या लोकांना बँकिंग व्यवस्थेत आणणे आणि त्यांचाकडून तंत्रज्ञानाचे मदतीने रोख रक्कम न वापरता व्यवहार करण्यास प्रोत्साहित करणे हे मोठे आव्हान आहे .या कमिटीने आपला अहवाल रिझर्व बँकेस जानेवरी 2014 मधे सादर केला .यामधे अल्प उत्पन्न धारक आणि छोटे व्यवसायिक यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विशेष बँका स्थापन करण्याची शिफारस केली होती .यास पेमेंट बँक असे म्हणावे असे सूचवले होते .
या बँका कश्या असाव्यात यासंबंधीचा कच्चा मसुदा जुलै 2014 रोजी प्रसारीत करण्यात येवून नोव्हेंबर 2014 रोजी त्यास अंतिम रूप देण्यात आले .सर्वाना किमान बँकिंग सेवा देणे हे त्यांचे प्राथमिक उद्दिष्ट असून त्यांचे प्रमुख ग्राहक स्थलांतरीत मजूर ,अल्प उत्पन्नधारक ,छोटे व्यापारी आणि असंघटित उद्योगात काम करणाऱ्या व्यक्ति असतील .या बँका इतर व्यापारी बँकेच्या प्रतिनिधी म्हणून काम करू शकतील .किमान भाग भांडवल 100 कोटी असेल यात पुरस्कर्त्याचा सहभाग 40%असेल आणि किमान एवढा भांडवली सहभाग पुढील पाच वर्ष असेल सध्या बँकिंग क्षेत्रास लागू असलेले परकीय भांडवलाची असलेली 76% मर्यादा या बँकांना पाळावी लागेल .यांचे पुरस्कर्ते व्यक्ति ,व्यवसायिक , एन बी एफ सी ,पी पी आई ,मोबाइल टेलिफोन कंपन्या ,सुपर मार्केट चेन ,कंपन्या असू शकतील किमान 5वर्ष व्यवसाय करण्याचा अनुभव असणे गरजेचे आहे .बँका आपले सर्व बँकिंग व्यवहार तंत्रज्ञानाचे सहाय्याने ,कागदविरहित पद्धतीने संगणक किंवा मोबाईलवर करतील .यांच्यामार्फत व्यवहार करण्यासाठी ए टी एम ,अभिकर्ते , छोटे व्यापारी यासारख्या विविध मध्यस्तांची मदत घेता येईल .जमा रक्कमेच्या 75%रक्कम एक वर्षाच्या सरकारी रोख्यामध्ये तर 25%रक्कम व्यापारी बँकेत ठेवावी लागेल ठेवावी लागेल त्यावर मिळणारे व्याज आणि विविध सेवा मार्गाने मिळणारे कमीशन , म्यूचुअल फंड योजनांची विक्री , विमा योजनांची विक्री इ . मार्गाने मिळालेले उत्पन्न हे या बँकेच्या उत्पन्नाचे साधन असेल . रोखीचे व्यवहार सोडून देवून सर्वाना ई कॉमर्सकडे या बँका घेवून जात आहेत .प्रायोगिक तत्वावर रिझर्व बँकेने बँकिंग नियम 1949 अनुसरून 11 पेमेंट बँकना 19 ऑगस्ट 2015 रोजी परवानगी दिली असून त्यानी 18 महिन्यात कंपनी ऍक्ट 2013 नुसार बँक सुरू करावी असे सूचवले होते .यातील 3 बँक चालू झाल्या आहेत लवकरच इतर बँक चालू होऊन मोठे आर्थिक परिवर्तन अपेक्षित आहे .पेमेंट बँक परवानगी खालील बँकाना मिळाली आहे :
1)Aditya Birla Nuvo
2)Airtel M Commerce Services
3)Cholamandalam Distribution services
4)Department of Posts
5)FINO PayTech
6)National Securities Depository
7)Reliance Industries
8)Sun Pharmaceutical
9)Paytm
10)Tech Mahindra
11)Vodafone M-Pesa
यातील 3,8,10 यानी परवाना परत केला असून बँक स्थापन करण्याचा विचार सोडून दिला आहे .तर 2,9,4 यांनी बँक व्यवसायास सुरुवात केली आहे .
©उदय पिंगळे
ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !
https://udaypingales.blogspot.in/?m=1
https://www.facebook.com/pingaleuday/.
आपल्या मित्रांनी ही माहिती वाचण्यासाठी आपण त्या॑ना tag करा म्हणजे अनेकांपर्यत ही माहिती एकाच वेळी पोहोचेल.
No comments:
Post a Comment