मसाला बॉन्ड
मसाला बॉन्ड हे परदेशात विक्री केलेले भारतीय रुपयातील कर्जरोखे आहेत .याचा मसाल्यांशी नावाशिवाय काहीही संबध नाही .यामुळे कमी व्याजदरात भांडवल उभारणीसाठी भारतीय कंपन्यांना एक पर्याय उपलब्ध झाला असून यापूर्वी भारतातील पायाभूत सुविधांच्या योजना मार्गी लावण्यासाठी 1000 कोटी रुपये एकूण दर्शनी मूल्य असलेल्या भारतीय रुपयातील कर्जरोख्यांची विक्री नोव्हेंबर 2014मध्ये आई एफ सी या जागतिक बँकेच्या गुंतवणूक विभागाकडून करण्यात आली . त्यांची नोंदणी लंडन शेअर बाजारात करण्यात आली .या रोख्यांची विक्री करतांना आई एफ सी ने त्यांना मसाला बॉन्ड असे नाव दिले ज्यातून भारतीय संस्कृती किंवा भारतीय खाद्यपदार्थाचे वैशिठ्य प्रतिबिंबित होते .अशा प्रकारच्या बॉन्डची रचना कशी असावी ,ते कुणी वितरित करावेत त्याची कुठे आणि कशी नोंदणी व्हावी यावर बराच अभ्यास होऊन त्याची अंतिम नियमावली भारतीय रिजर्व बँकेने बनवली त्यानंतर अशाप्रकारच्या बॉन्डची विक्री परदेशात करण्याची परवानगी व्यापारी बँका आणि भारतीय कंपन्याना दिली .याप्रमाणे बँका आणि पायाभूत सुविधा निर्माण करणाऱ्या कंपन्यांनी असे कर्जरोखे विकून निधी उभारला आणि गरजेप्रमाणे वेळोवेळी निधी जमा करीत आहेत .आधीच्या नावाला भरपूर प्रसिद्धी मिळाल्याने आता अशा पद्धतीच्या कर्जरोख्याना आता मसाला बॉन्ड हेच नाव कायम झाले आहे .
रुपया हा इतर देशांच्या चलनात पूर्णत: परावर्तित झालेला नसल्याने जर एखाद्या कंपनीने परकीय चलनातील कर्जरोखे काढले तर भविष्यात त्यावरील व्याज आणि मूद्दल त्याच चलनात द्यावे लागत असल्याने या चलनाचे रुपयाच्या तुलनेतील मूल्य वाढले तर कर्ज घेणाऱ्या कंपनीवर वाढीव बोजा पडतो .जर भारतीय चलनातील कर्जरोखे काढले तर जरी त्या चलनाचे विनिमय मूल्य वाढले तर कबूल केलेल्या रुपयांएवढेच परकीय चलन द्यावे लागत असल्याने गुंतवणूक करणाऱ्याला कमी उतारा मिळतो. मसाला बॉन्ड मुळे भारतीय कंपन्यांना कमी खर्चात परकीय चलन मिळवण्याचा आणखी एक अधिकचा पर्याय उपलब्ध झाला आहे .ही गुंतवणूक अधिक आकर्षक व्हावी म्हणून अर्थमंत्रालयाने यावरील भांडवली कर रद्द केला असून व्याजावरिल कर 20%वरुन 5%पर्यत खाली आणला आहे .
या बॉन्ड मुळे परदेशी गुंतवणुक भारतात आली असून या गुंतवणुकदारांचा भारतीय अर्थव्यवस्था चलनावरील विश्वास वाढला आहे .अलीकडे 11मे 2017रोजी NHAl ने प्रथमच मसाला बॉन्ड विकून 3000 कोटी रुपये जमवले आहेत .
©उदय पिंगळे
ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !
https://udaypingales.blogspot.in/?m=1
https://www.facebook.com/pingaleuday/.
आपल्या मित्रांनी ही माहिती वाचण्यासाठी आपण त्या॑ना tag करा म्हणजे अनेकांपर्यत ही माहिती एकाच वेळी पोहोचेल.

No comments:
Post a Comment