एन पी एस चे अँप
राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) ही PARDA यांनी प्रवर्तित केलेली अत्यल्प व्यवस्थापन फी असलेली पेन्शन योजना आहे. जरआपण त्याचे सदस्य असलात (?) तर आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता एका चुटकीसरशी आपणास आपल्या खात्यासंबंधीची माहिती मिळू शकते. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंटऑथोरिटी यांनी नुकतेच एक नवीन अँप तयार केले आहे. गुगल प्ले स्टोर आणि अँप स्टोरवर ते उपलब्ध आहे. या अँपच्या साहाय्याने खातेदारांस आपल्या खात्यासंबंधी सर्व अद्ययावत माहिती एन पी एस चे रेकॉर्ड किपर nsdl cra च्या संकेतस्थळाचा लॉग इन आय डी व पासवर्ड वापरून मिळू शकते. हे अँप गुंतवणुकांदाराना हाताळायला सोपे (users friendly) असून अँड्रॉईड सिस्टीम असलेल्या सर्व मोबाईलमध्ये चालते.
हे अँप डाऊनलोड केल्यावर क्लिक केले की nps चे सांकेतिक चिन्ह (logo) असलेले पेज येईल.त्याच्या खाली लॉग इन आणि कोंट्रिब्युशन हे पर्याय येतील. त्यांच्या मधोमध हिंदी असे लिहले असून त्यावर क्लिक केल्यास पेजची भाषा हिंदी होईल. याखालीच तीन वर्तुळाकार गोल असून यातील पहिल्या गोलावर क्लीक केले की नवीन रजिस्ट्रेशन करता येते. यातील लॉग इन आय डी हा तुमचा nps खातेक्रमांक असून पासवर्ड cra च्या वेबपेजचा असेल. येथे आपणास नवीन पासवर्ड तयार करता येईल. याप्रमाणे पासवर्ड तयार केलात की आपण लॉग इन करू शकाल. याशेजारील एक गोल तुम्हाला पेन्शन किती मिळेल हे सांगेल तर दुसरा गोल आपणास उतारा किती मिळत आहे हे दाखवून देईल. येथे आपण आपला लॉग इन आय डी (म्हणजेच आपला nps खातेक्रमांक) आणि पासवर्ड टाकणे जरुरीचे असून येथेच नविन पासवर्ड तयार करता येईल. येथे लॉग इन न करता contribution हा पर्याय निवडल्यास आपला खातेक्रमांक व जन्मतारीख याची विचारणा करण्यात येवून त्याची खात्री करून द्यावी लागेल. ती करून दिली की सर्व गोष्टी बायपास करून आपणास tier 1 किंवा 2 खात्यात विविध पर्याय वापरून थेट गुंतवणूक करता येईल.
लॉग इन केल्यावर होम पेज उघडेल. येथे उजवीकडे होम, अकाउंट डिटेल्स, प्रोफाइल सेटिंग आणि लॉग आऊट या क्रमाने आयकॉन आहेत. यातील होम आयकॉनवर योजनेतील एकूण गुंतवणुकीचे एकत्रित मालमत्ता मूल्य दिसेल. ते tear1 आणि tear 2 असे स्वतंत्ररीत्या पहायची सोय आहे. त्याशेजारील आयकॉनवर क्लिक केले असता आपल्या खात्याचा तपशील समजतो जसे नाव, पत्ता, ईमेल, मोबाईल क्रमांक, स्थायी पेन्शन खाते क्रमांक (pran), आपली वैयक्तिक खाते माहिती आणि यासंबंधीत तक्रारीची स्थिती हे सर्व समजेल. त्याशेजारी असलेला आयकॉन प्रोफाईल सेटिंगचा असून आपणास येथून कॉन्टॅक्ट डिटेल्स म्हणजे मोबाइल क्रमांक व मेल आय डी बदलता येईल. तसेच सुरक्षितता म्हणजेच आपला पासवर्ड आणि सुरक्षिततेचा प्रश्न बदलता येईल. त्याच्या शेजारी लॉग आऊट असून येथून बाहेर पडता येईल. उजव्या बाजूस तेथे डाव्या वाजूस असलेल्या तीन रेषावर क्लीक केले असता अँपमध्ये प्रवेश होऊन स्क्रीनशॉट मध्ये दाखवल्या प्रमाणे होम, अकाउंट डिटेल्स, कोंट्रिब्युशन, रिसेंट कोंट्रिब्युशन, स्कीम चेंज, ऍड्रेस चेंज,प्रोफाईल सेटिंग,नोटिफिकेशन, टियर 2 विथड्रावल, इन्कवायरी आणि ग्रीव्हसेस यासारखे विविध पर्याय येतील.
या अँपचा वापर आपण खालील कारणासाठी करू शकतो.
1.आपल्या खात्याची शिल्लक पाहणे.
2.आपल्या खात्यावरील उलाढालीची नोंद आपल्या मेलवर पाठवण्याची विनंती करणे.
3.Tear-1 आणि Tear-2 खात्यात रक्कम भरणे.
4.योजनेचा प्राधान्यक्रम बदलणे.
5.आधार क्रमांक खात्यास जोडणे
6.पत्यात बदल करणे
7.Tear 2 खात्यातील रक्कम काढून घेणे.
8.आपल्या खात्याची पूर्ण माहिती पाहणे.
9.शेवटचे 5 व्यवहार पहाणे.
10. मोबाईल क्रमांक ईमेल मधील बदल नोंदवणे.
11.पासवर्ड, कळीचा प्रश्न बदलणे.
12.ओटीपी चा साहाय्याने पासवर्ड बदलणे.
13.एन पी एस संबंधित बदलांची नवनवीन माहिती मिळवत राहणे.
एन पी एस ही स्वतंत्र योजना असून याविषयीची सर्व माहिती आपण यापूर्वीच्या लेखात करून घेतली आहेच. यावरील गुंतवणुकीवर योजनेच्या अखेरीस काही प्रमाणात कर लागत असल्याने तसेच यातून किती परतावा मिळेल याची हमी नसल्याने त्यातून भविष्यात 15 % हुन अधिक परतावा मिळाला तरच ही योजना फायदेशीर ठरेल, असे होइल की नाही ते येणारा काळच ठरवेल. तूर्तास या योजनेस मिळणारी 50 हजाराची 80/CCD (1B) अनुसार अधिकची करसवलत त्यातून सर्वाधिक करदेयता असणाऱ्या व्यक्तींचा वाचू शकणारा 15 हजार रुपयांचा कर एवढेच आकर्षण आहे.
©उदय पिंगळे
मनाचेTalks या ई पब्लिकेशन्सवर 07 डिसेंबर 2018 रोजी पूर्वप्रकाशीत.
ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !
https://udaypingales.blogspot.in/?m=1
https://www.facebook.com/pingaleuday/.
हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .

No comments:
Post a Comment