#वस्तूबाजार
वस्तूबाजार (commodity market) हा एक वेगळ्या प्रकारचा बाजार असून यात विविध वस्तूचे व्यवहार होतात .इतर कोणत्याही बाजारास लागू असणारे मागणी व पुरवठा हे तत्व , म्हणजे ' मागणी अधिक पुरवठा कमी असेल तर भाव जास्त ' आणि ' मागणी कमी पुरवठा अधिक असेल तर भाव कमी ' याही बाजारास लागू होते .व्यवहार होवू शकणाऱ्या वस्तूंच्या बाजार भावात मोठा फरक पडल्याने पूर्ण अर्थव्यवस्थेला धक्का बसू शकतो . उदा .खनिज तेलाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले तर मोठ्या प्रमाणात खनिज तेल आयात करणाऱ्या देशात प्रचंड महागाई वाढू शकते . शेतकऱ्याला त्याच्या उत्पादित मालास योग्य भाव न मिळाल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान होवू शकते .
या बाजाराचा इतिहास हा इसवीसनापुर्वीचा असून तेव्हाही हजर (spot) आणि पुढील कालावधीतील (future) सौदे करण्यात येत होते .अन्य देशात असे सुरुवात होण्यापूर्वी भारतात असे व्यवहार केले जात होते .प्रदीर्घ काळ पारतंत्र्यात राहिल्याने ते ठप्प झाले . 1953 साली (FMC) फॉरवर्ड मार्केट कमिशनची स्थापना होवून ते पुन्हा सुरू झाले . नंतर अशा व्यवहारांमुळे महागाई वाढते अशी सार्वत्रिक टीका होवू लागल्याने बंद करण्यात आले .आर्थिक उदारीकरणानंतर असे व्यवहार पुन्हा चालू होणे अपरिहार्य झाले आणि 2003 पासून ते नियमित चालू आहेत .विविध ठिकाणी असणाऱे कृषी उत्पन बाजार हे एकप्रकारचे वस्तूबाजारच आहेत .आता मोठ्या प्रमाणात हे व्यवहार एक्सचेंजच्या माध्यमातून होत असल्याने गुंतवणूकदारांना त्याची हमी आहे . भारतात सध्या (MCX) मल्टी कमोडिटी एक्सचेंज आणि (NCDEX) नेशनल कमोडिटी एन्ड डेरिवेटीव एक्सचेंज या दोन एक्सचेंज मधून मोठ्या प्रमाणात कमोडिटी व्यवहार केले जातात .याशिवाय (NMCX) नेशनल मल्टी कमोडिटी एक्सचेंज , (ICEX) इंडियन कमोडिटी एक्सचेंज , (UCE) युनिवर्सल कमोडिटी एक्सचेंज , (ACEDE) ए सी ई डेरिवेटीव एक्सचेंज येथूनही व्यवहार करता येतात . (BSE) मुंबई शेअर बाजार आणि (NSE) राष्ट्रीय शेअर बाजार याना कमोडिटी व्यवहार करण्याची परवानगी अलीकडेच मिळाली असून लवकरच त्यांच्याकडून असे व्यवहार चालू होवू शकतात .पूर्वी या व्यवहारांवर यापूर्वी उल्लेख केलेल्या (FMC) फॉरवर्ड मार्केट कमिशनचे नियंत्रण होते ही संस्था नोहेंबर 2015 मध्ये (SEBI) सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये विलीन झाल्याने आता सेबीचे या व्यवहारावर अंतिम नियंत्रण आहे .एकूण 12 प्रकारच्या 91 वस्तूंचे व्यवहार वस्तूबाजारात करण्याची सध्या परवानगी आहे .यात वेळोवेळी बदल होत असतात . काही वस्तू वगळल्या जातात तर काहींचा नव्याने सामावेश करण्यात येतो . या संबंधीची माहिती राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येते .
असे असले तरी येथील वस्तूबाजारात व्यवहार प्रमुख्याने खालील चार प्रकारांत होतात .
१.मौल्यवान धातू (सोने , चांदी )
२.शेतमाल (सोयाबीन , जिरे , कापूस )
३.धातू (तांबे , एलुमीनीयम , शिसे )
४.उर्जा (खनिज तेल , फर्नेस ऑईल , नैसर्गिक वायू )
येथे व्यवहार करण्यासाठी कमोडिटी ब्रोकरकडे के वाई सी ची पूर्तता करून ट्रेडिंग खाते उघडावे लागते .आपला नियमित ब्रोकर आपणास ही सुविधा देत असेल तर उत्तमच .सध्या असे व्यवहार करण्यास वेगळ्या डी मेट अकाऊंटची गरज आहे .यातील वायद्याचे व्यवहार फ्युचर आणि ऑप्शनच्या माध्यमातून कमोडिटी एक्सचेंजवर होत असल्याने याच्याशी संबंधित लोकांव्यतिरिक्त गुंतवणूकदारांना या बाजारात गुंतवणूक करण्याची संधी प्राप्त झाली आहे .आपली गुंतवणूक वेगवेगळ्या प्रकारे विभागलेली असावी यासाठीचा हा अधिकचा पर्याय आहे .भावातील चढउतारामूळे होणारे नुकसान टाळण्याचा प्रयत्न करणारे हेजर्स आणि भावातील चढउताराचा अंदाज घेवून त्याच्या दिशेने अथवा विरुद्ध दिशेने व्यवहार करणारे धाडसी स्पेक्यूलेटर यांच्या आवडीचे आहेत . हे व्यवहार समजण्यास सोपे आहेत यासाठी मार्जिन म्हणून व्यवहाराच्या 5 ते 8% रक्कम द्यावी लागते .यात डे ट्रेडिंगही करता येते पाहिजे असल्यास डिलिव्हरीही घेता येते . मार्केट सकाळी 10 ते रात्री 11:30 पर्यंत चालू असून ही वेळ काही अमेरिकेतील डे लाईट टाईमच्या काळात 11:55 पर्यंत वाढवण्यात येते .या पूर्ण कालावधीत सर्व नॉन एग्री कमोडिटीचे व्यवहार होवू शकतात . इंटरनेशनल एग्री कमोडिटीचे व्यवहार सकाळी 10 ते रात्री 9:30 पर्यंत व इतर सर्व एग्री कमोडिटीचे व्यवहार सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत केले जातात .इन्ट्रा डे पोजीशन प्रत्येक बाजार बंद होण्याच्या 25 मिनिटे आधी क्लोज केल्या जातात . येथे होणारे फ्युचरचे व्यवहार हे शेअर्सच्या फ्युचर व्यवहाराप्रमाणेच असून नव्याने सुरूवात करण्यात आलेले ऑप्शनचे व्यवहार हे शेअर प्रमाणे स्पॉट प्राईजवर नसून फ्युचर प्राईजवर आहेत एवढाच फरक आहे .त्याचप्रमाणे सध्या शेअरच्या फ्यूचरचा लॉट साईज हा पाच लाख रुपये असल्याने तेथे गुंतवणुक करण्यासाठी मार्जिन म्हणून मोठी रक्कम गुंतवावी लागते .शेअर फ्युचरमध्ये मोठ्या लॉट साईजमुळे होणाऱ्या नफा /नुकसानीचे प्रमाण खूप मोठे असते .यातूलनेत अत्यल्प गुंतवणूक करून येथे सौदे करता येत असल्याने अधिकाधिक गुंतवणूकदार या बाजाराकडे आकर्षित होत आहेत . या सर्वानी केलेल्या व्यवहारांमुळे वस्तूंचे बाजारातील दर सर्वसाधारणपणे नियंत्रणात रहाण्यास मदत होते .
इतर कोणत्याही बाजारावर परिणाम करणारे विविध घटक असतात त्याप्रमाणे या बाजारावर परिणाम करणारे घटक आहेत परंतू येथील बाजारभाव जगभरातून निश्चित होत असल्याने हा बाजार मूठभर लोकाना नियंत्रित करता येणे शक्य नाही .तरीही काही आणीबाणीचा प्रसंग उद्भवला तर विविध बंधने लागू करून बाजार नियंत्रक त्यावर मात करू शकतात .
©उदय पिंगळे

No comments:
Post a Comment