#अर्थसंकल्पीय_अन्याय्य_तरतुदी
नुकताच 2018-2019 साठी केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाला .यातील दीर्घकालीन भांडवली नफ्यावर प्रस्तावित कर (Long Term Capital Gain)आणि म्यूचुअल फंडांच्या डीवीडेंड वरील कर तरतुदी या भांडवल बाजारास पोषक नसल्याचे सर्वसाधारण वातावरण असल्याने शुक्रवारी मोठ्या प्रमाणात पडझड झाली .याविषयी मी काहीतरी लिहावे असे अनेकांनी सुचवले .परंतू LTCG या आधीही होताच, 31 डिसेंबर 2017 पर्यत दिलेली Garndfathered ची सवलत, तसेच एक लाख रुपयांहून जास्त असलेल्या दीर्घकालीन नफ्यावर 10% कर म्हणजे तशी किरकोळ गोष्ट आहे असे मला वाटत होते .सध्या भांडवलबाजारातील गुंतवणुकीस अन्य ठोस पर्याय नसल्याने तसेच म्यूचुअल फंड, विदेशी गुंतवणूकदार आणि स्वदेशी वित्तसंस्था यांच्याकडे मोठ्या प्रमाणात पैसा असल्यामुळे हे जाणकार लोक 31मार्च 2018 पर्यंत मिळणारा करमुक्त नफा काढून घेतील .म्यूचुअल फंड त्यांच्या डीवीडेंड देणाऱ्या योजनांवर जास्त मोठ्या टक्केवारीत लाभांश देतील .यामुळे जी पडझड होईल त्या परिस्थितीचा लाभ घेवून पुन्हा गुंतवणुकीस सुरुवात करतील आणि काही दिवसात सर्व स्थिरस्थावर होईल असे माझे मत होते .याशिवाय अर्थसंकल्प मंजुरीसाठीच्या चर्चेस उत्तर देताना काही किरकोळ सवलती देण्याचा एक नवीन पायंडा हल्ली पडला आहे .तेव्हा त्या सवलती काय आहेत ते लक्षात घेवून नंतर एक सविस्तर लेख टाकावा असे माझ्या मनात होते परंतू माझा युवा मित्र हर्ष दीक्षित याने आज सकाळी मला पाठवलेली पोस्ट मला अर्थसंकल्पीय तरतुदीविषयी लिहायला प्रवृत्त करीत आहे .मला त्याच्या मागील तर्कसंगत विचारसरणी (logical thinking ) अधिक भावली.
भांडवल बाजाराशी संबंधीत सर्वानीच माननीय अर्थमंत्री महोदयांच्या हे लक्षात आणून दिले पाहिजे की कल्याणकारी योजना अंमलात आणायच्या तर पैसा जमा करणे आवश्यक आहे .कर द्यायला मनापासून कोणालाच आवडत नाही . तरीही विविध मार्गांनी कर आकारणी करण्यावाचून सरकारकडे पर्याय नाही परंतू अशी आकारणी करताना अन्याय होणार नाही हे पहावे .
१ मुळात दीर्घ मुदतीचा भांडवली नफा रद्द करण्यामागे लोकांनी अधिकाधिक प्रमाणात भांडवल बाजारात गुंतवणुक करावी हा होता .हा हेतू साध्य झाला आहे का ? गुंतवणूकदार अन्य कोणताही मार्ग नसल्याने इथे येत आहेत ते नुसता कर द्यावा लागतो म्हणून दुरावले जावू शकतात ते टिकून रहाणे जरूरीचे आहे .
२ अल्पकालीन फायद्यासाठी 15% ऐवजी 10% आणि दीर्घकालीन फायद्यासाठी महागाई विचारात न घेता (without indexation) 10%याऐवजी ही कर आकारणी 10% दराने महागाई विचारात घेवून (with indexsation) करावी .
३ रोखीचे नियमित व्यवहार (cash market) आणि भविष्यातील व्यवहार ( F & O) यातून होणाऱ्या अल्प आणि दीर्घ नफा तोट्याचा मोजणी करताना एकत्रित विचार होवून करावी .फक्त एका ठिकाणचा फायदा विचारात घेतला जावू नये .cash मधे 150000 फायदा झाला आणि F & O मधे 200000 तोटा झाला तर एकत्रितपणे तोटा झालेला असताना फक्त cash वर कर भरावा लागू नये .
४ दीर्घकालीन नफ्यावर कर नसल्याने तोटा पुढे ओढाता येत नव्हता आता यावर कर आकारणी झाली तर तोटा पूर्वीप्रमाणे पुढील 7 आर्थिक वर्षात ओढता येणार की नाही ? याबाबतीत खुलासा होणे जरुरीचे आहे .जर तो पूर्वीप्रमाणेच carry forward होत असेल तर 10/15 वर्षांनंतर मिळणाऱ्या नफ्यावर आपण कर लावतो तर तोट्याची अड्जस्टमेंट फक्त 8 वर्ष करणे हे अन्यायकारक नाही का ?
५ .लाभांशावर कंपनीने 15%कर भरलेला असताना तो पुन्हा लाभार्थी व्यक्तीकडून 10% घेणे अन्यायकारक आहे . जरी त्या व्यक्तीस लाभ होत असेल तरी त्याने मोठ्या प्रमाणात धोका स्वीकारलेला असतो याकडे दुर्लक्ष करू नये .अनेक सेवानिवृत्त लोक अशी जोखीम स्वीकारून लाभांशाचा पर्याय घेत आहेत त्यांचे आर्थिक गणित या करामुळे बिघडणार आहे . कोणालाही होणारा फायदा हा सहजासहजी मिळत नसून त्यासाठी त्याने गूंतवलेले पैसे आणि स्वीकारलेली जोखीम याचा फायदा त्याला मिळायला नको का ?
मागील अनुभवावरून शेतीतून अपेक्षित विकासलक्ष गाठणे आणि कल्याणकारी योजना राबवणे हे निव्वळ स्वप्नरंजन असून यासाठी सरसगट सर्वांना वेठीस धरणे योग्य नसून वरील अन्यायकारक मुद्दे विचारात घेवून कर आकारणीत बदल करण्यात यावेत .

©उदय पिंगळे
संदर्भ :whatsapp वरील मेसेज ,
I won't mind paying LTCG. Why not keep just 10% Tax on Capital Gains irrespective of short Term or Long Term. Give Indexation Benefit in LTCG.
Why differentiate btwn Cash n FnO Gains. Allow to set off FnO losses against Gains made in Cash or vice versa. Why we shall pay Taxes on cash Gains despite FnO losses resulting Net Loss in FY?
Allow us to Carry Fwd losses forever instead of just 7 years. You are taxing 10 20 30 years Gains and not allowing CF of losses more than 7 years.
If a Person is unable to make profits in Fno he still needs to pay Tax on cash Gains. Till one is not profitable in Fno he cannot set off against cash Gains.
Dear FM. A profit is net Profit and not just From Cash or FnO.
Lastly @adhia03 Once put your money in Mkt oncein year like 2008 and then Comment on Capital Gains.

TA Harsh Dixit.
No comments:
Post a Comment