ई टी एफ (Exchange Traded Fund)......😃
ई टी एफ (Exchange Traded Fund) हा एक म्यूचुअल फंडाचे जवळपास जाणारा एक कल्पक समभाग गुंतवणूक प्रकार असून त्याचे व्यवहार मान्यताप्राप्त शेअर बाजारात होतात. ई टी एफ चे मालमत्तेमधे समभाग ,रोखे ,वस्तू बाजारातील वस्तू ,धातु किंवा त्यांचे मिश्रण असू शकते .भारतीय बाजारातील ई टी एफ हे प्रामुख्याने समभाग रोखे यांचे निर्देशांक (index),आणि सोने (gold) या प्रकारात विभागले आहेत .समभागाप्रमाणे दलालामार्फत आपण त्याची खरेदी विक्री करू शकतो .यामुळे गुंतवणूकदाराना विविध प्रकारचे समभाग रोखे खरेदी करण्याऐवजी त्याच प्रमाणात गुंतवणूक असलेले त्याचे छोटे भाग मिळतात .
ई टी एफ मधे गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार हा विशिष्ठ समभाग रोखे यामधे गुंतवणूक करत नसून त्याच्या एकत्रित मूल्यमापनात गुंतवणूक करीत असतो .ई टी एफ चे समभागांची थेट विक्री न होता ते निर्माण करून प्रथम योजनेच्या पुरस्कर्त्यास 50000 किंवा अधिक यूनिटचे पटीत दिले जातात त्यांचेकडून अधिकृत मध्यमांमार्फत मध्यस्थ , हमीदार ,वित्तीय गुंतवणूकदार यांचे मार्फत एका न्यासाकडे (ट्रस्ट) जातात. तेथे त्याची छोट्या भागात विभागणी होवून दुय्यम बाजारात विक्रीसाठी येतात .ज्याप्रमाणे फंडाच्या मालमत्तेचे मूल्य त्याच्या निव्वळ मालमत्ता मूल्यात (nav) प्रतिबिंबित होते त्याप्रमाणेच याचा बाजारभाव असायला हवा परंतु ई टी एफ चा बाजार भाव मागणी पुरवठा या बाजाराच्या तत्वाप्रमाणे सतत बदलत रहातो .भावातील फरकामुळे बहुतेक गुंतवणूकदार आपल्या कडील समभाग दुय्यम बाजारात विकतात .त्याना आपल्याकडील समभाग वाढवून ते मूळ यूनिट मधे बदलून त्याचे मालमत्तेमधे रूपांतरित करता येऊ शकते .
आतापर्यंत सर्वच ई टी एफ ना चांगला प्रतिसाद मिळून त्यातून अपेक्षित रक्कम जमा झाली .याची लोकप्रियता वाढण्यास,यावर कोणतेही खर्च नसणे ,अत्यल्प रक्कम गुतवण्याची मुभा , भावातील चढऊतार ,आधी शेअर विकून मग खरेदी करण्याची सवलत (short selling), समभागाप्रमाणे असलेल्या करसवलती ,खरेदी विक्री मुळे मूळ मालमत्तेमध्ये न पडणारा फरक आणि गुंतवणुकदाराना मिळालेला आकर्षक उतारा कारणीभूत ठरला आहे .
या योजनेतील दोन प्रमुख तोटे म्हणजे यातील मूळ गाभा बदलता येत नाही त्यामुळे असे बदल करून व्यवस्थापन करण्याची संधी मिळत नाही आणि समभागाप्रमाणे खरेदी विक्री होत असल्याने दलाली व इतर कर द्यावे लागतात त्यामुळे खर्चात वाढ होते .आपल्याला अनेक प्रकारात गुंतवणूक करता येते आणि त्याचे काही फायदे असतात तसे तोटे असतात . तेव्हा आपल्याकडील पैसे ,जबाबदाऱ्या, अपेक्षित परतावा ,जोखिम घेण्याची ,त्वरित निर्णय घेण्याची क्षमता याचा विचार करून आपणास योग्य असे गुंतवणुक पर्याय निवाडावे .आवश्यक असल्यास कोणत्याही योजनेशी संबधीत नसलेल्या व्यवसायीक गुंतवणूक नियोजकाचा सल्ला घ्यावा.
(हा लेख ई टी एफ या गुंतवणूक प्रकाराची सर्वसाधारण माहिती करून देण्यासाठी लिहिला आहे)
©उदय पिंगळे
ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !
https://udaypingales.blogspot.in/?m=1
https://www.facebook.com/pingaleuday/.
आपल्या मित्रांनी ही माहिती वाचण्यासाठी आपण त्या॑ना tag करा म्हणजे अनेकांपर्यत ही माहिती एकाच वेळी पोहोचेल.

No comments:
Post a Comment