' भारताच्या आंतरराष्ट्रीय मानांकनात मुडीजकडून वाढ '
मूडीज ही आंतरराष्ट्रीय मानांकन संस्था (Rating agency)असून 1909 पासून ती विविध देशांना ग्रेड देते .या ग्रेड Aaa , Aa , A , Baa , Ba , B , Caa , Ca आणि C या नऊ विभाग असून 1,2,3 असे उपविभाग आहेत .ते उतरत्या क्रमाने आहेत .दिलेल्या कर्जाची परतफेड न केल्यास कीती प्रमाणात जोखिम आहे ते या ग्रेड ने दाखवले जाते .Aaa ही सर्वात सुरक्षित ग्रेड असून C ही सर्वात धोकादायक ग्रेड आहे .अशा प्रकारे ग्रेड दिल्यावर बाजारात त्यादेशाची प्रतिमा एक निर्माण होते .या संस्थेचे संस्थापक जॉन मूडी यांनी मूडी कोर्पोरेशनची मूडीज इन्वेस्टर्स ही कंपनी असून ती क्रेडिट रेटिंग आणि आर्थिक बाबतीत संशोधन करते .
रेटिंग ठरवताना देशावरील कर्ज व ते फेडण्याची क्षमता यांचा विचार केला जातो .याची निश्चित अशी पद्धती नसून ही एजंसी 100 हून अधिक अर्थशास्त्रज्ञ आणि विश्लेषक यांच्याशी विचारविनिमय करून त्या देशाचे रेटिंग ठरवते .या वरून त्या देशातील अर्थव्यवस्था कशी आहे .आखलेली धोरणे परकीय गुंतवणुकदाराना अनुकूल आहेत की नाहीत , आयात निर्यात यांचे प्रमाण , राजकीय स्थिती यांचा अंदाज बांधण्यास मदत होते .अशा प्रकारे मूल्यांकन करणे हा त्यांचा परंपरागत व्यवसाय आहे .Dun and bandstreet या कंपनीने moodys चा ताबा 1962 ला मिळवून या कंपनीच्या शेअर्सची न्यूयार्क शेअर बाजारात 2000 साली मूडीज कॉरपोरेशन या पूर्विच्याच नावाने सार्वजनिक कंपनी म्हणून भागविक्री केली .2007 साली मूडीज इन्वेस्टर्स सर्विस आणि मूडीज अॅनालेटिकल सर्व्हिस अशा दोन कंपन्यांत व्यवसाय विभागणी झाली .यातील रेटिंग व्यवसाय मूडीज इन्वेस्टर्सकडे आणि इतर व्यवसाय मूडीज अॅनालेटिकल सर्व्हिसेस कडे विभागला गेला . जागतिक बॉन्ड व्यवसाय हा मूडीज , फिच आणि स्टँडर्ड अँन्ड पुअर या तीन मोठ्या रेटिंग एजन्सीकडे एकवटला असून त्यांच्या रेटिंगचा परकीय गुंतवणूकदार गुंतवणूक करताना विचार करतात .
मुडीजने 14 वर्षाचे नंतर भारतीय बॉन्डचे रेटिंग Baa3 होते ते Baa2 वर आणले आहे .याचा अर्थ सुधारणा झाली आहे .या मधून आपली गुंतवणूक कीती सुरक्षित आहे याचा अंदाज बांधता येतो .सर्व प्रकारची सरकारी कर्जे , म्युनसीपल बॉन्ड , कॉरपोरेट बॉन्ड , मनी मार्केट फंड , बँका , नॉन बँकिंग कंपन्या , दीर्घ मुदतीची कर्जे या सर्वांचा विचार केला जातो .या तिन्ही मान्यवर संस्थांची रेटिंग देण्याची पध्दत निरनिराळी आहे .यांपैकी मूडीज आपले शोध निबंध (research reports) , वेळोवेळी एखाद्या देशाविषयी प्रदर्शित केलेले मत , बाजारात नविन कर्ज घेवून येणाऱ्याना मार्गदर्शन अशा विविध मार्गाने गुंतवणूकदाराना मोलाचा सल्ला देत आहे .
मानांकनात Baa3 वरून Baa2 अशी सुधारणा झाली याचा अर्थ यापूर्वी ज्या आर्थिक सुधारणा आपण अमलात आणल्या त्या योग्य असून त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत .यामधे नोटाबंदी , जी एस टी ची अमलबजावणी ,स्टेट बँक सहयोगी बँकांचे विलिनीकरण , रेरा कायदा , भ्रष्टाचार विरोधी कायदा , यू आई एन , यू डी ए वाई पॉवर बॉन्ड या गोष्टीचा विचार केला असावा .जागतिक बँकेने या सुधारणांची प्रसंशा केली आहे आणि व्यवहारास योग्य देशांच्या यादीतील भारताचे स्थान 130 वरून 100 व्या क्रमांकावर आणले आहे . आयात निर्यात यातील फरक (balance of payments) आणि चालू खात्यावरिल तूट (fiscal deficits) या गोष्टी विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार आणि जागतिक बँक यांच्या दृष्टीने चिंतेची बाब राहिली असली तरी ती एका विशिष्ठ मर्यादेत राहील यासाठी सरकारचा प्रयत्न आहे .वित्तीय तूट 3% या मर्यादेत ठेवण्याचा संकल्प त्यांनी केला आहे . रेटिंग वरील आक्षेपाबाबत मूडीजने तपशीलवार खुलासा करणारे (FAQ) पत्रक प्रसिद्ध केले असून 2017/18 च्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात 7.5% राहील असा अंदाज व्यक्त केला आहे . यांमुळे परकीय गुंतवणूकदार पेन्शन फंड याची भारतीय बाजारातील गुंतवणूक वाढण्याची शक्यता असून भांडवलबाजारावर याचा सकारात्मक परिणाम दिसत असून बाजार रोज नविन उच्चांक करीत आहे .
©उदय पिंगळे