#पगारदारांनो_आपली_करदेयता_कशी_मोजाल_?
'सरते आर्थिक वर्ष आणि करदेयता' या 18 जानेवारीच्या लेखात या वर्षी आयकर वाचवण्यासाठी कोणत्या योजना आहेत यांची माहिती घेतली. त्यात आपले एकूण उत्पन्न किती होते त्याचा अंदाज घेण्यास सांगितले होते.अनेकांनी हा अंदाज कसा काढावा हे विचारले असून त्यास मदत व्हावी म्हणून हा लेख लिहीत आहे.आयकर कायद्याच्या दृष्टीने एखादया व्यक्तीचे करपात्र उत्पन्न निश्चित करताना त्या व्यक्तीस मिळालेले वेतन, व्यवसायातून मिळालेले उत्पन्न, शेतीचे उत्पन्न, अल्प /दीर्घ मुदतीच्या नफा, व्याजाचे उत्पन्न, घरापासून मिळालेले उत्पन्न, अन्य उत्पन्न या सर्व गोष्टींचा विचार केला जातो. यातील काही उत्पन्नावर मोजणी करतानाच सूट मिळत असल्याने ते विचारात घेताना ही सूट घेऊन मिळालेले उत्पन्न, हे एकूण उत्पन्न ठरवताना विचारात घेतले जाईल. उदा. भाड्याच्या घरात राहणाऱ्या व्यक्तीस काही अटींची पूर्तता केल्यास जास्तीत जास्त 5 हजार रुपये एवढे मासिक भाडे हे करमुक्त असल्याने तेवढे भाडे वगळून जास्तीचे भाडे उत्पन्नात मिळवले जाईल. अशाच सवलती व्यवसायपासूनचे उत्पन्न मोजताना मिळत असतील तर त्या घेऊन येणारे उत्पन्न हे व्यवसायाचे उत्पन्न समजले जाते .एक घर विकून विहित कालावधीत त्याच पैशात दुसरे घर घेतले आणि या व्यवहारात दीर्घकालीन नफा होत असेल तरी तो उत्पन्नात मिळवला जात नाही. शेतीचे उत्पन्न करपात्र नाही परंतू ते सोडून अन्य उत्पन्न असेल तर करदेयता निश्चित करण्यासाठी ते निव्वळ उत्पन्नात मिळवावे लागते.
अल्पमुदतीचा भांडवली नफा हा निव्वळ उत्पन्नात मिळवून त्यावर कर आकारणी ही व्यक्तीचा नियमित कर आकारणी दर कितीही असला तरी 15% या विशेष दराने केली जाते. त्याचप्रमाणे 1 लाखावरील दिर्घमुदतीच्या नफ्यावर रक्कम निव्वळ उत्पन्नात मिळवून नियमित दराने कर आकारणी न होता 10% या विशेष दराने होते. व्याजाचे उत्पन्नचा विचार करताना सर्व ठिकाणाहून मिळणाऱ्या व्याजाचा विचार करावा. यात बचत खात्यावरील व्याज, मुदत ठेवींवरील व्याज, कंपनी ठेवींवरील व्याज, रोख्यावरील व्याज, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीवरील व्याज या सर्वांचा समावेश होतो. यापैकी पोस्ट/ बँक बचत खात्यातील रकमेवर मिळणारे व्याज हे सर्वसाधारण करदात्यांना 10 हजार रुपयांपर्यंत करमुक्त आहे (80/TTA) तर जेष्ठ नागरिकांना बचत खात्यावरील व्याजाशिवाय मुदत ठेवींवरील 50 हजार रुपयांपर्यंत मिळणारे व्याज करमुक्त आहे (80/TTB). याहून अधिक असलेले व्याज निव्वळ उत्पन्नात मिळवावे. पी पी एफ करमुक्त रोखे यांवरील व्याज हे पूर्णपणे करमुक्त असल्याने निव्वळ उत्पन्नात ते मिळवले जात नाही, परंतू ते जाहीर करावे लागते. जर व्यक्ती स्वतःच्या घरात राहात असेल तर त्याला मिळणारे घरभाडे हे करपात्र असते. जर त्याचे अन्य घर असेल आणि ते भाड्याने दिले असेल तर मिळणारे भाडे अथवा भाड्याने दिले नसल्यास त्याचे काल्पनिक भाडेमूल्यातुन घरपट्टी वजा करून राहिलेल्या रकमेतून 30% दुरुस्ती खर्च (तो केलेला असो अथवा नसो) वजा करून राहिलेली रक्कम निव्वळ उत्पन्नात मिळवली जाते.याशिवाय काही अन्य उत्पन्न असेल तर त्यातून काही सूट मिळत असेल तर ती निव्वळ उत्पन्नात मिळवली जाते.
करदात्याने अशा प्रकारे काही सूट वजा करून आलेल्या सर्व उत्पन्नाची बेरीज केले की निव्वळ उत्पन्न मिळेल. निव्वळ करपात्र उत्पन्न काढण्यासाठी त्यातून व्यवसाय कर जो जास्तीत जास्त ₹2500 असतो तो वजा होईल. ₹ 40000 ची प्रमाणित वजावट कमी होईल. याशिवाय 80/C, 80/CCC,80/CCD (जास्तीत जास्त 1 लाख 50 हजार रुपये), 80/CCD-1B नुसार एन पी एस मधील जास्तीत जास्त 50 हजार, 80/D नुसार जास्तीतजास्त 1 लाख, 80/DD किंवा 80/DU नुसार जास्तीत जास्त 1लाख 25 हजार रुपये,80 /DDB नुसार जास्तीतजास्त 1 लाख रुपये, 80/E नुसार शैक्षणिक कर्जावरील पूर्ण व्याज, सेक्शन 24 नुसार 2 लाखापर्यंत गृहकर्जावरील व्याज, 80/EE नुसार पहिल्या घरासाठी घेतलेले 50 हजार अधिकचे गृह कर्जावरील व्याज, 80/G, 80GGC नुसार एकूण उत्पन्नाच्या 10% मर्यादेत 50 ते 100% सूट मिळते.80/ TTA किंवा 80/TTB (लागू असेल त्याप्रमाणे) यासारखी रक्कम निव्वळ उत्पन्नातून वजा करावी.
येणारी रक्कम हे त्या व्यक्तीचे निव्वळ करपात्र उत्पन्न होय. ती व्यक्ती सर्वसामान्य व्यक्ती आहे, जेष्ठ किंवा अतिजेष्ठ त्याप्रमाणेच अनुक्रमे 2.5, 3, 5, लाखावरील रकमेवर 2.5 ते 5 लाख उत्पन्नास 5%, 5 ते 10 लाख उत्पन्नास ₹12500+ 20% व त्यावरील उत्पन्नास ₹112500+ 30% यादराने करमोजणी करावी. जर व्यक्तीचे उत्पन्न 3.5 लाखहून कमी असल्यास येणाऱ्या करातून जास्तीतजास्त ₹2500 ची कर सवलत घ्यावी. अशा तऱ्हेने राहिलेल्या करावर 4% उपकर (सेस) लावावा. याप्रमाणे नक्की कर किती लागू शकेल याचा अंदाज बांधता येतो. आयकर विभागाच्या संकेतस्थळावर करपात्र उत्पन्नावर आपली करदेयता काढून देणारा कॅलक्युलेटर उपलब्ध आहे.
पगारदार व्यक्तीचा कर काही प्रमाणात मुळातून कापून घेतला जातो. व्याजाच्या उत्पन्नातून काही ठिकाणी मुळातून कर कापून घेतला जातो. आपल्या अंदाजित करापैकी एकूण कराच्या 15% कर 15 जूनपर्यंत, 45% कर 15 सप्टेंबरपर्यंत, 75% कर 15 डिसेंबरपर्यंत आणि 100% कर 15 मार्चपर्यंत सरकारकडे जमा करावा लागतो नाहीतर मासिक 1% दंड पडतो. मुळातून कापलेला कर वगळून वरील तारखेच्या आधी नियमित करभरणा करावा. हा कर भरणा चलन भरून बँकेत किंवा ऑनलाइन करता येतो. हे सर्व समजून घेतले तर स्वतःचा कर किती होईल ते काढता येऊ शकेल आणि करभरणा वरील वेळापत्रकाप्रमाणे करता येईल. काही अडचण असल्यास तज्ञ व्यक्तीची मदत घेता येईल.

©उदय पिंगळे
मनाचेTalks या ई पब्लिकेशन्सवर 15 फेब्रुवारी 2019 रोजी पूर्वप्रकाशित.
ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1
https://www.facebook.com/pingaleuday/.
हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .
No comments:
Post a Comment