UPI एक पाऊल नव्या अर्थक्रांतीकडे....😄
2009 साली whatsapp आले आणि संपर्कक्षेत्रात मोठी क्रांती झाली. या क्रांतिचे आपण साक्षीदार आहोत. अशाच प्रकारची महत्वाची क्रांती अर्थक्षेत्रांत होऊ घातली आहे. भारतीय रिझर्व बँकेने परावर्तित केलेली NPCL (National Payment Corporation of India) ही संस्था आणि भारतात कार्यरत असणाऱ्या व्यापारी बँकांनी परावर्तित कलेली IBA (Indian Banks Association) यांनी पैशांची देवाणघेवाण सहज, सुलभ आणि जलद होण्यासाठी UPI ही प्रणाली विकसित केली आहे. तिचे कार्य Mastercard, Visa, Rupay या प्रणाली प्रमाणे चालते. 11एप्रिल 2016 रोजी RBI चे तत्कालीन गवर्नर डॉ रघुराम राजन यांचे हस्ते ती लोकार्पण करण्यात आली.
या प्रणालीचे प्रमुख वैशिष्ठ म्हणजे आपला स्मार्टफोनच आपले debit card होईल. त्याचे सहाय्यानेआपण पैशांचे व्यवहार कुठेही, कधीही आणि झटपट करू शकतो. यापूर्वी आपण हे व्यवहार Netbanking, Mobile app, NEFT, RTGS, IMPS, Mobile wallet याद्वारे करीत होतोच. त्याद्वारे व्यवहार करताना खाते क्रमांक, खात्याचा प्रकार, बँकेचे नाव,IFSC कोड यांची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे नवीन लाभार्थीची नोंदणी करण्यासाठी काही तासांचा अवधी लागू शकतो. UPI प्रणाली ही IMPS ची सुधारीत आवृती असून आपणास व्यवहार पूर्ण करण्यास VPA (Verchual payment address) ची गरज असते. दोन VPA मधील व्यवहार इतर कोणत्याही माहितीची देवाणघेवाण न होता फक्त मोबाईल पिनने पूर्ण होतात.
सध्या देशातील सरकारी व सहकारी बँकापैकी 30प्रमुख
बँकांनी त्यांच्या ग्राहकांना ही सुविधा देण्याचे मान्य केले असून अनेकांनी VPA बनवण्यास Play store वर App उपलब्ध करुन दिले आहेत. हे app download करुन activate करून आपला VPA बनवणे सहज सोपे आहे. यासाठी आपली वैयक्तिक माहिती देऊन OTP चे साह्याने VPA बनवता येतो. तो सर्वसाधारपणे email id प्रमाणे 'स्वतःचे नाव @बँकेचे नाव' या स्वरूपाचा असतो. याप्रमाणे एकदा हा VPA तयार झाला की आपण आपले आर्थिक व्यवहार झटपट करण्यास मोकळे. या प्रणालीने आपण जेव्हा एखादी वस्तू अगर सेवा खरेदी करू तेंव्हा त्याला आपला VPA देऊ सदर पुरवठादार त्याचे बिल VPA वर पाठवेल ते आपण मान्य केल्यास एका click ने आपल्या खात्यातील पैसे विक्रेत्याचा खात्यात जाऊन व्यवहार पूर्ण होईल. यासाठी मोबाईल पीन पुरेसा असून वेगळा OTP घ्यावा लागणार नाही. याचपद्धतीने आपणास मित्र व नातेवाईक यांचेमध्ये पैशांचे व्यवहार करता येतील. यापूर्वींचे प्रणालीमध्ये व्यवहार कोण करीत आहे? व कशासाठी करीत आहे? यासाठी एक मध्यस्थ होता या प्रणालीत एक लाख रुपयांचे व्यवहार कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट होत असल्याने रोख रक्कम बाळगण्याची आवश्यकता भासणार नाही. रोज 2500 कोटी व्यवहार विनाव्यत्यय होऊ शकतील इतक्या मोठ्या प्रमाणात ही यंत्रणा सक्षम आहे. या पध्दतीने व्यवहार करण्यास RBI ने फक्त व्यापारी बँकांनाच परवानगी दिली आहे. याच पध्दतीचे व्यवहार Globle vertual payment address बनवून जगभरात करता येऊ शकतील. सध्या ज्या वेगाने या पध्दतीने व्यवहार करणारांची संख्या वाढते आहे त्यावरून Credt card, Debit card, Netbanking, mobil app/wallet यांना मागे सारून रोख रकमेऐवजी UPI या एकच माध्यमातून सर्व व्यवहार होतील. याचाच वेध घेऊन आपणही आपला VPA बनवून आपले व्यवहार करण्याची सुरुवात करुया.
या प्रणालीच्या काही मर्यादा आहेत.
1)ही प्रणाली वापरण्यास स्मार्टफोन (अँड्रॉइड) असणे गरजेचे आहे.
2)सध्या सर्व बँकानी ही प्रणाली आपल्या ग्राहकांना देऊ केलेली नाही. यात TJSB सारखी छोटी सहकारी बँक आहे तर Bank of India सारखी मोठी सरकारी बँक नाही.
3)सध्या किमान ₹50/- तर कमाल ₹1लाख पर्यंतच व्यवहार या प्रणालीने करता येतात.
4)अधिकाधिक ग्राहकांनी ही पध्दत वापरावी यासाठी बँका स्वतःहून प्रयत्न करतील असे वाटत नाही.
असे असले तरी अधिकाधिक लोकांनी जर या प्रणालीचा वापर करण्यास सुरुवात केली तर भविष्यात सर्व बँका आपल्या सर्व ग्राहकांना सर्व प्रकारच्या मोबाईलवर (IOS, Window) ही सुविधा देऊ शकतील. ग्राहक संघांचे संघप्रमुख आणि संघ सभासद UPI प्रणाली देऊ करणाऱ्या बँकेचे ग्राहक असतील तर त्यानी आपल्या संघाचे व्यवहार स्वतचा VPA बनवून करण्यास सुरुवात करावी सध्या खालील बँकांचे VPA बनवण्याचे app playstore वर उपलब्ध आहे.
1)Allahabad Bank
2)Andhra Bank
3)Axis Bank
4)Bank of Baroda
5)Bank of Maharashtra
6)Bhartiya Mahila Bank
7)Canara Bank
8)Catholic Syrian Bank
9)DCB Bank
10)Federal Bank
11)HDFC Bank
12)HSBC Bank
13)ICICI Bank
14)IDBI Bank
15)IDFC Bank
16)Indus Ind Bank
17)Karnataka Bank
18)Kotak Mahindra Bank
19)Oriental Bank of Commerce
20)Panjab National Bank
21)Ratnakar Bank
22)State Bank of India
23)South Indian Bank
24)Standard Chartered Bank
25)TJSB Sahakari Bank
26)UCO Bank
27)United Bank of India
28)Union Bank of India
29)Vijaya Bank
30)Yes Bank
उदय पिंगळे
मोबाईल 8390944222
ई मेल udaypingale@yahoo.com/udaypingale23@gmail.comR

No comments:
Post a Comment